मुंबई, 4 सप्टेंबर: मुंबई पोलिसांबद्दल अविश्वास दाखवल्यानंतर अभिनेत्री कंगना रानौट हिला महाराष्ट्रात सर्व स्तरातून विरोध होतो आहे. कंगना विरुद्ध शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार असं Tweet युद्ध सुरूच आहे. कंगना राणावत हिच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने ठाण्यात कंगणाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. त्यानंतर भडकलेल्या कंगनाने पुन्हा एक खरमरीत Tweet करत म्हटलं आहे की, "सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात माझं मत व्यक्त केलं म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय... मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं... ", असं कंगनाने लिहिलं आहे.
After Sushant and Sadhus murder now beating my posters with chappals for my opinions on administration, it seems Mumbai is addicted to blood🙂 https://t.co/dWRSnL6NCE
त्याअगोदर कंगनाने तिला विरोध करणाऱ्यांविषयी खरमरीतपणे हेही लिहिलं आहे, "महाराष्ट्राबद्दल हे असं प्रेम दाखवणाऱ्या सगळ्या चापलुसांनी हे लक्षात घ्या की, मराठी मनाचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांना मोठ्या पडद्यावर दाखवणारी हिंदी चित्रपटांच्या इतिहासातली मी पहिली अभिनेत्री दिग्दर्शक आहे. आणि याच लोकांनी या चित्रपटांना प्रदर्शित होण्याआधी विरोध केला होता."
All chaploos who are showing their love for Maharashtra must know I am the first Actor/ Director in the history of Hindi Cinema to bring Maratha Pride Shiva Ji Maharaj and Rani LaxmiBai to the big screen and I faced huge opposition during the relase from the same people 🙂 https://t.co/HMzDMcpdwQ
कंगनाच्या या Tweet नंतर पुन्हा या सोशल मीडिया युद्धाला नवं तोंड फुटणार आहे. 'कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.' 9 सप्टेंबरला मुंबईत येते आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं थेट आव्हानच कंगनाने दिलं होतं.
किसी के बाप का नहीं है महाराष्ट्र, महाराष्ट्र उसी का है जिसने मराठी गौरव को प्रतिष्ठित किया है। और मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे? pic.twitter.com/MVvyiXiLzc
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.
कंगना हिच्यावर चहूबाजूंनी टीका होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनाचं नाव न घेता तिला फटकारलं आहे. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.