Home /News /maharashtra /

Assembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता

Assembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता

 बंडखोर गटानेच स्वत: मूळ पक्ष म्हणून घेण्याची ही देशातली पहिलीच केस आहे.

बंडखोर गटानेच स्वत: मूळ पक्ष म्हणून घेण्याची ही देशातली पहिलीच केस आहे.

बंडखोर गटानेच स्वत: मूळ पक्ष म्हणून घेण्याची ही देशातली पहिलीच केस आहे.

पुणे, 03 जुलै :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm uddhav thackery) यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर  अखेर आज विधानसभा अध्यक्षाची (Assembly Speaker Election) निवडणूक पार पडली. शिंदे सरकारने आपली पहिली लढाई जिंकली आहे. पण, शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आता न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेनं 39 आमदारांनी पक्षाचा आदेश मोडून मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर शिंदे गटानेही 16 आमदारांविरोधात व्हीप मोडल्याची तक्रार केली आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयातच निकाली निघणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी पुकारल्यानंतर आज पहिल्यांदाच बंडखोर आमदारांना घेऊन मुंबई गाठली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. पण, अपक्षेप्रमाणे शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला होता. पण, बंडखोरांनी आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करून मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बंडखोर गटाचे आमदार भरत गोगावले यांचा शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून उल्लेख केला आहे. हा उल्लेख शिंदे गटासाठी नक्कीच कायदेशीर लढाईत फायदेशीर ठरू शकतो, असं निरिक्षण ज्येष्ठ कायदेतज्न अँड सुधाकर आव्हाड यांनी नोंदवलं आहे. (बाजारात Photo QR ची एन्ट्री! ही पेमेंट सुविधा नाही तर व्यवसाय वाढवण्याची ट्रीक) तसंच, बंडखोर गटचं स्वत: ला मुळ शिवसेना म्हणून संबोधू लागल्याने हा सगळा वाद सर्वोच्च न्यायालयासोबतच निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. कारण मुळ शिवसेना कोणती हे ठरवण्याचा अधिकार हा फक्त निवडणूक आयोगालाच आहे असंही आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर, घटनेतील शेड्युल 10 प्रमाणे या वादाचा न्यायनिवाडा होणार आहे. पण बंडखोर गटानेच स्वत: मूळ पक्ष म्हणून घेण्याची ही देशातली पहिलीच केस आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देतंय याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. सेनेची तक्रार ही सभागृहाच्या पटलावर घेतली आहे. (VIDEO : ...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट) लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक झाली. पण, विधानसभेच्या नियमानुसार, पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्या व्हीपच्या विरोधात 39 आमदारांनी मतदान केलं आहे. आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे.  सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आधीच याचिका दाखल केली आहे. आधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेले आहे. शिवसेनेतील 16 आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केलं आहे, अशी तक्रार शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून  भरत गोगावले यांनी दिले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maharashtra News

पुढील बातम्या