रत्नागिरी, 20 मे: मुंबईकरांची गावी व्यवस्था नसल्याची कबुली देत त्यांनी गावी जाऊ नका म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगणं हे सरकारच अपयश आहे. शिवसेनेच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात गावागावात मुंबईकरविरुद्ध गावकरी असा वाद पेटल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
हेही वाचा.. आदित्य ठाकरे आणि भाजप नेत्यात जुंपली, राष्ट्रीय वाद पोचला वैयक्तीक पातळीवर
प्रवीण दरेकर आणि भाजपाच्या आमदारानी बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोरोना उपाययोजनांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. रत्नागिरीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत चालला आहे. जिल्ह्यात डेरवणमधल्या वालावलकर रुग्णालयात लवकरच स्वॅब टेस्टिंग मशीन आणण्यात येणार असल्याचे या बैठकीत निश्चित झाल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
प्रवीण दरेकर यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. केली. मुंबईकरांची गावी व्यवस्था नसल्याची कबुली देत त्यांनी गावी जाऊ नका म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगणं हे सरकारच अपयश आहे. शिवसेनेच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात गावागावात मुंबईकरविरुद्ध गावकरी असा वाद पेटल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला.
हेही वाचा...'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर.., चक्क तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं
उदय सांमत यांनी घेतला शिवसेनेवरील टीकेचा समाचार..
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलेली टीका शिवसेना नेते आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना चांगलीच जिव्हारी लागली. त्यांनी शिवसेनेवरील टीकेचा समाचार घेतला आहे. प्रवीण दरेकर हे रेड झोनमधून आलेले आमदार आहेत. त्यांनी आणि भाजपच्या इतर आमदारांनी आधी तीन दिवस क्वारंटाईन व्हावे. टेस्ट करुन घ्यावी, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांवर बोलण्याएवढे प्रवीण दरेकर मोठे नाहीत, असंही सामंत यांनी इशारा दिला आहे. भाजप आमदारांच्या या दौऱ्यामुळे कोकणला कोरोनाचा धोका होऊ शकतो, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.