मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाने ठाकरेंचं वाढलं टेन्शन, 'मातोश्री'वर खलबतं, पुढचा मार्ग काय?

BREAKING : शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाने ठाकरेंचं वाढलं टेन्शन, 'मातोश्री'वर खलबतं, पुढचा मार्ग काय?

शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग रचनेबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शिवसेनेचं निश्चितच टेन्शव वाढलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग रचनेबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शिवसेनेचं निश्चितच टेन्शव वाढलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग रचनेबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शिवसेनेचं निश्चितच टेन्शव वाढलं आहे.

मुंबई, 3 ऑगस्ट : शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग रचनेबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने महाविकास आघाडीचं निश्चितच टेन्शव वाढलं आहे. विशेषत: शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत निर्णय घेताच शिवसेना सतर्क झाली आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये मोठमोठ्या शहरांच्या होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या नव्या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसतील. अनेक भागांमधील राजकीय गणितं बदलतील. या नव्या बदलामुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जास्त फटका बसू शकतो. याशिवाय मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. कारण शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे मुंबईतील सत्ता टिकवणं हे शिवसेनेपुढील मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळेच शिवसेना सतर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या निर्णयावरुन शिवसेनेची तातडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: ही बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. रात्री साडेआठ वाजेपासून या बैठकीला सुरुवात झालीय. राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कायदेशीर बाजू या बैठकीत अभ्यासली जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकासआघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत पुन्हा एकदा 2017 प्रमाणेच 227 वॉर्डांची रचना ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने मुंबई तसंच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येतही सुधारणा केली आहे. वॉर्ड रचनेमध्ये सुधारणा केल्यामुळे आता महापालिकेत 236 सदस्यांऐवजी 227 सदस्यसंख्या होईल. (शिंदे सरकारच्या नवीन निर्णयामुळे पुणे राष्ट्रवादी आक्रमक; कोर्टात आव्हान देण्याची तयारी) महाविकासआघाडी सरकारने केलेल्या वॉर्ड पुर्नरचनेमुळे मुंबई महापालिकेची संख्या 236 झाली होती. या पुर्नरचनेवर काँग्रेससह भाजपनेही आक्षेप घेतला होता, एवढच नाही तर काँग्रेसने याविरोधात कोर्टातही याचिका दाखल केली होती. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी कालच मुंबईतल्या काही काँग्रेस नेत्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. या भेटीमध्ये देवरा यांनी वॉर्डच्या फेररचनेबाबत काँग्रेसची नाराजी बोलून दाखवली, त्यानंतर आज लगेचच शिंदे आणि फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारची वॉर्ड फेररचना रद्द केली. मुंबईत काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना प्रभाग रचनांच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांमध्येच मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती, यावरून महाविकासआघाडीमध्येच वाद निर्माण झाला. काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेवरुन शिवसेनेवर टोकाची टीका केली होती. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन न्यायालयाची देखील पायरी चढली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली का? अशा चर्चांना उधाण आलं होतं.
First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav thackeray

पुढील बातम्या