मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''आम्ही डरपोक नाही...आम्ही झुकणार नाही'', किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

''आम्ही डरपोक नाही...आम्ही झुकणार नाही'', किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेनंतर (Press Conference) शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेनंतर (Press Conference) शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेनंतर (Press Conference) शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 20 सप्टेंबर: भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेनंतर (Press Conference) शिवसेना नेते (Shivsena Leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांच्याबाबत नाट्य म्हणणे म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी खिळखिळी करण्यात येत आहे. गृह मंत्रालयानं केलेली कारवाई कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार झालं असं म्हणणं चुकीचं असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. आरोप करण्याचे पुरावे असतील तर पोलीस दल किंवा इतर संस्था यांच्या पुरावे द्यावे. केंद्र सरकारच्या आदेशानं अस करत असाल तर गृह मंत्रालयाचं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सोमय्यांचा मोठा खुलासा, मुश्रीफांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडणार मुख्यमंत्री आणि कोणाचेही काय पहायचे असेल त्यांनी मंगळावर चंद्रावर जाऊन पाहावं लोकशाही आहे. पण केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ते जे करत आहे आरोप करणे ही फॅशन झाली आहे, असा टोला ही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लगावला आहे. मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा. पण आम्हाला आमच्या सण साजरे करू द्या, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. भगवा सोडून हिरवा रंग जवळ केला की नाही त्यांना लवकरच कळेल. आपलं अंतरंग पहावा, असं राऊत म्हणालेत. ठाण्यात MNS कार्यकर्त्यांचा तुफान राडा; टोल नाक्याची तोडफोड करतानाचा LIVE VIDEO आरोप करून अनेक नेत्यावर दबाव केंद्राकडून आणला जातो. हसन मुश्रीफ यांनी आवाहन स्वीकारलं आहे. आम्ही डरपोक नाही. आम्ही झुकणारं नाही. अनेक मंत्री केंद्रात आहे असे आरोप भाजपने केले होते ते हरिश्चंद्र म्हणून नावाला आले, असा हल्लाबोलही संजय राऊत केला आहे. किरीट सोमय्यांचे आरोप हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला अंबे मातेचं दर्शन घेता आलं नसल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तक्रार करणाऱ्यालाच अटक केली असल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी परिषदेत केला आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणालेत. मला सहा तास कोंडून ठेवलं. वकिलांनी नोटीस दिल्यानंतर मग मला विसर्जन करायला जाऊ दिलं. मला सीएसटी स्टेशनला अडवून ठेवलं.मला गाडी मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी खोटी बनवलेली ऑर्डर वाचून दाखवली अजी चॅलेंज केली तर पळून गेले, असं त्यांनी सांगितलं. रात्रभर नाट्य, कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलेले सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहात गनिमी काव्यानं हल्ला होऊ शकतो हे ऑर्डर मध्ये लिहिलंय मग हे इतर एजन्सीला का कळवलं नाही. माझ्यावर हल्ला कोण करणार हसन मुश्रीफ की त्यांचे गुंड ?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्या भीतीने माझ्यावर हल्ला करणार आहे का? ही शरद पवार यांची रणनीती आहे का ?, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: BJP, Kirit Somaiya, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party)

पुढील बातम्या