जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रात्रभर नाट्य, कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलेले किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहात

रात्रभर नाट्य, कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलेले किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहात

रात्रभर नाट्य, कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलेले किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहात

भाजप नेते किरीट सोमय्या BJP leader kirit somaiya) यांना पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 20 सप्टेंबर: भाजप नेते किरीट सोमय्या BJP leader kirit somaiya) यांना पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलं. कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police)ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे. मुंबईवरुन किरीट सोमय्या कोल्हापूर जाण्यासाठी निघाल्यावर सोमय्या यांना मुंबईपासून पोलिसांनी फॉलोअप केला होता. त्यानंतर कऱ्हाडला थांबण्यास सोमय्या तयार झाले. किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये जिल्हाबंदीची नोटीस आम्ही दिली. आम्ही त्यांना जिल्ह्यात न येण्याची विनंती केली. त्यांनी कऱ्हाड मध्ये उतरावे अशी आम्ही विनंती केली, असं कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी सांगितलं.

जाहिरात

तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वााजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून (Mahalakshmi Express) कऱ्हाडला उतरले. सध्या किरीट सोमय्या शासकीय विश्रामगृहात थांबले असून सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत.

वसई रेल्वे स्थानकावरचा थरारक VIDEO, मृत्यूच्या दाढेतून महिलेला वाचवलं पण…

 कोल्हापुरात जिल्हाबंदी

दुसरीकडे कोल्हापुर जिल्ह्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे. 20 सप्टेंबरला पहाटे 5 ते 21 सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. सोमय्यांना सुद्धा याबद्दल नोटीस बजावली. दुसरीकडे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मुश्रीफ समर्थकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुश्रीफ समर्थक कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जमावबंदी लागू असल्यामुळे मुश्रीफ समर्थकांना लागू आहे.

ताण-तणावातून तुम्हाला मुक्तता हवीये; घरच्या घरी करू शकता हे 5 उपाय

 विशेष म्हणजे, सोमय्यांनी मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातील साखर कारखान्यावर जाऊन पाहणी करणार आहे. या मतदारसंघात मुश्रीफ यांच्या मोठ्या प्रमाणात समर्थक आहे. त्यामुळे मोठा राडा होण्याची चिन्हं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात