जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिवसेनेमध्ये पुन्हा मोठं खिंडार

एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिवसेनेमध्ये पुन्हा मोठं खिंडार

एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिवसेनेमध्ये पुन्हा मोठं खिंडार

पालघरमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर एक दिवस होत नाही तेवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी राजकीय रणनीती बघायला मिळतेय.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट यांच्यात प्रचंड संघर्ष बघायला मिळाला. अखेर ही लढाई मुंबई हायकोर्टात गेली होती. कोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा खूप मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासूनची शिवसेनेसाठी ही सर्वात दिलासादायक बातमी मानली जात होती. ही घटना ताजी असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पुन्हा आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने डिवचलं आहे. शिवसेनेच्या पालघर जिल्हा प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. त्यामुळे मुख्य शिवसेनेसाठी हा झटका मानला जातोय. एकनाथ शिंदे यांचा हे धक्कातंत्र असल्याचं मानलं जात आहे. ( ‘राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण?’, आदित्य ठाकरेंचा तळेगावात आक्रोश ) यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनेच्या विस्तारासाठी जिल्ह्यात कार्यरत राहण्याचे निर्देश दिले. वैभव संख्ये यांनी युती सरकारला पाठींबा देणे हा पालघर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का आहे. तर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाविरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडूनदेखील सडकून टीका सुरु आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील तळेगावात वेदांत-फॉक्सोन नावाचा मोठा फ्रोजेक्ट येणार होता. पण राज्यातील सत्तांतरानंतर हा प्रोजेक्ट गुजरात राज्यात गेला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. वेदांता प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंनी आज तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात