कणकवली, 18 जुलै : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवलीमध्ये पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट केला आहे. निलेश राणे यांनी गीतेश राऊतांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 22 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. कणकवलीमध्ये एका चौकात गीतेश राऊत यांची गाडी पोलिसांनी अडवली आहे. यावेळी गीतेश राऊत आणि एका पोलिसात गाडी वळवण्यावरून वाद झाला आहे. यावेळी, गीतेश राऊत यांनी दुसऱ्या पोलिसाला, 'मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे, याने मला शिवी दिली, याला मी सोडणार नाही' असं म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. तर संबंधीत पोलिसाने, गीतेश राऊत यांनीच पहिले शिवी दिल्याचं म्हणत आहे. तसंच, माझी नोकरी घालवणार तू कोण? असा सवाल केला आहे. या 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कणकवलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पैसे काढण्यासाठी SBI एटीएमची आहे ही मर्यादा, विसरलात तर द्यावं लागेल शुल्क
या व्हिडिओबद्दल निलेश राणे म्हणाले की, 'शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्युटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलीस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते.'
हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. 'दारू पिऊन पोलिसांनी हुज्जत घालण्याचा कुणी आरोप करत असेल तर माझा मुलगा साधी सुपारी सुद्धा घेत नाही. त्यामुळे तरीही मी पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.'
ही गाडी माझ्याचं मुलाची असून गाडीत गीतेशच आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. जर माझा मुलगा जर दोषी असेल तर कारवाई करावी किंवा जर पोलीस दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
आईला कोरोनाची लागण झाल्याचे 23 मुलाला झाले नाही सहन, राहत्या घरी घेतला गळफास
तर या प्रकरणी आधी तक्रार दाखल झाली पाहिजे. तक्रार नोंदवली नसेल तर चौकशी कशी होणार? ज्या भाषेत विनायक राऊतांचा मुलगा पोलिसांशी बोलत आहे, त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
पुण्याच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या अधिकाऱ्याने दिले धडे, अजितदादांनी दिले आदेश
तसंच, निलेश राणे काय आरोप करत आहे, त्यांच्या वक्तव्याला आम्ही किंमत देत नाही, पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, असं म्हणत विनायक राऊत यांनी निलेश राणेंना टोला लगावला आहे.