पुणे, 18 जुलै : खरंतर पुणेकरांना कोणी शिकवलेलं आवडत नाही पण पुण्यात चक्क मुंबईच्या मनपा आयुक्तांनीच पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोना नियंत्रणाचे धडे दिल्याचं बघायला मिळालं. आता पुण्याला कोरोनातून मुक्त करण्यासाठी मुंबईच्या अधिकाऱ्याने सांगितलेला पॅटर्न वापरावा, असा आदेश खुद्द पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती कशी आटोक्यात आणायची हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आ वासून उभा आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी खास मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पुण्यात पाचारण केलं होतं. इकबाल सिंह चहल यांच्यासोबत पुण्यातील सर्व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. चहल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धारावीमध्ये कोरोना नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे काम केले. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतून कोरोना हद्दपार झाला आहे. धारावी सारख्या भागात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणणे, हे अत्यंत जिकरीचे काम होते. पण, प्रशासनाने पूर्ण हिंमतीने लढा देऊन धारावीला कोरोनातून बाहेर काढले. असं कोण आऊट देतं? पंचांनी केलेल्या चुकीचा हा VIDEO पाहून डोक्यावर हात माराल धारावीमध्ये कशा प्रकारे काम केले, काय उपाययोजना केली, कोरोनावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवलं. काय -काय केले पाहिजे, अशी महत्त्वाची माहिती चहल यांनी या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना उदाहरणांसह पटवून दिलं. या बैठकीला खुद्द अजित पवारही हजर होते. त्यांनी चहल यांचा अनुभव ऐकल्यानंतर धारावीच्या धर्तीवर पुण्यात एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश अजित पवारांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. पुण्याला लवकरात लवकर कोरोनातून मुक्त करण्यासाठी धारावी पॅटर्नसारखे काम करावे, अशी सूचनाही पवारांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली. देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे? शिवसेनेनं घेतली फिरकी दरम्यान, पुण्यात एकीकडे सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अतिसौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.