रत्नागिरी, 30 जुलै: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या, असं आवाहन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चाकरमान्यांना केलं आहे.
मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यानी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवाला कोकणात आपल्या गावी यावं, असंही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे दिलसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळेच चाकरमान्यांसाठी एसटी बस सेवा सुरु करण्यास उशीर होत असल्याचही खासदार राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा.. गुप्तांगातून स्वॅब घेणे प्रकरण: शिवसेना व एमआयएम नगरसेवक आक्रमक
बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाइन पाळावाच लागेल, असंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भावनेच्या भरात चाकरमान्यांबाबत निर्णय घेणे, योग्य ठरणार नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोकणात येणाऱ्यांपैकी कोरोना संशयितांची रॅपिड टेस्टही केली जाणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1746 आहे. त्यापैकी 1133 बरे झाले असून आजपर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 380 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 263 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत मृत्यू 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका का? असा रोखठोक सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सार्वजनिक गणेशोत्साहाबाबत गाईडलाईन जारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना निर्बंध घालते आहे. मात्र, विरोधी पक्ष भाजपनं राज्य सरकारच्या विरोधी भूमिका घेतली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका का? असा रोखठोक सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा... वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा प्रताप! प्रियकरासोबत घरातच केलं असं...
आशिष शेलार यांनी ट्वीट करून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सार्वजनिक गणेश मंडपांची परवानगी घ्या, असं आवाहन केलं आहे.
गेल्या वर्षीच्या आकड्यांच्या आधारे मनपाने गणेश मंडपांना परवानगी द्यावी, अशी मागणी देखील शेलार यांनी केली आहे. गणोशोत्सवाबद्दल पक्षाने दिलेल्या न्यायालयीन लढ्याची शेलार यांनी यावेळी आठवण करुन दिली आहे. या वर्षी खंड पडल्यास त्याचा संदर्भ घेत भविष्यात अडचण येऊ नये, याकरता शेलार यांनी आवाहन केल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Shiv sena, Vinayak Raut