मुंबई, 30 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gangrape Case) 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशला 'रामराज्य' म्हटलं जातं. तिथं एका मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणाच्या घरावरील कौले जरी उडवली जातात एका अभिनेत्रीच्या तेव्हा अन्याय म्हटलं जातं. आता कुठं आहेत रामदास आठवले? अशा शब्दात संजय राऊत यांनी रामदास आठवले यांना फटकारलं आहे.
हेही वाचा...महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेनं हातोडा चालवला होता. त्यानंतर रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण केली होती. कंगनावर न्याय झाला आहे, अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली होती. एवढंच नाही तर आठवले यांनी कंगनाची भेट घेऊन तिला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देखील दिलं होतं. त्यानंतर रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांची युपीबाबत भूमिका काय? त्यांनी तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी, असा सल्ला राऊत यांनी रामदास आठवले यांना दिला आहे. वेगळ्या राज्यात अशा घटना घडतात, तेव्हा आवाज उठतो मग आता का नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही शांतपणे याकडं पाहतोय. संधी मिळेल तेव्हा आवाज उठवू, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
I and my party Shiv Sena, welcome the judgment and congratulate Advani ji, Murli Manohar ji, Uma Bharti ji & the people who have been acquitted in the case: Sanjay Raut, Shiv Sena, on the #BabriMasjidDemolitionVerdict https://t.co/WOQAtoYkXQ
— ANI (@ANI) September 30, 2020
शिवसेनेकडून बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी निकालाचं स्वागत...
बहुप्रतिक्षित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (Babri Demolition Case) बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासहसर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी सांगितलं की, कोर्टाच्या निर्णयाचं आपण स्वागत करतो. कोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलं आहे. कोर्टानं कट नसल्याचे सांगितलं आहे. आता 'त्या' (बाबरी मशीद विध्वंस) घटनेला विसरायला हवं. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे संजय राऊत यांनी सगळ्यांचं अभिनंदनही केलं आहे.
हेही वाचा..भीषण अपघात! शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Ramdas athavale, Shiv sena