मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेना आमदार वैभव नाईक COVID-19 पॉझिटिव्ह, संपर्कातल्या 85 जणांची होणार कोरोना टेस्ट 

शिवसेना आमदार वैभव नाईक COVID-19 पॉझिटिव्ह, संपर्कातल्या 85 जणांची होणार कोरोना टेस्ट 

माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेच जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि आपली टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी 21 जुलै: शिवसेना आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik) यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह (COVID-19 test Positive) आली आहे. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग शासकिय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैभव नाईक यांच्यासमवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) तीन दिवस दौऱ्यात होते त्यामुळे सामंत आता होम क्वारंटाईन झाले आहेत. तर वैभव नाईक यांच्या संपर्कात 85 जण आले होते. त्यांना हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांचीही टेस्ट केली जाणार आहे.

दरम्यान, आमदार वैभव नाईक यांचा व्हिडिओ समोर आला आहे. माझ्या निष्काळजीपणामुळे संपर्कात आलेल्यांना त्रास झाला असेल तर मी जाहीर माफी मागतो असं नाईक यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेच जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि आपली टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्यंमंत्री सत्तारही पॉझिटिव्ह

राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारमधले (Cm Uddhav Thackeray) आणखी एक राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. सत्तार यांनीच ही माहिती दिली आहे. सत्तार यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी आपली टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. काळजीचं कारण नाही. प्रकृती चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनीच आपली चाचणी करून घ्यावी असं आवाहनही सत्तार यांनी केलं आहे.

COVID-19: कोल्हापूरमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वॉर्डबॉय

कोरोनाच्या काळात मदत कार्यासाठी बाहेर जाणं होतं आहे. त्यावेळी कोरोनाची बाधा झाली असेल.परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) संसर्ग कमी झालेला नाही, पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

विरोधीपक्ष नेत्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत ठाकरे सरकारचा जीआर

गेल्या 24 तासांत 8369 नव्या Covid रुग्णांचं निदान झालं आहे, तर 246 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 7188 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 27 हजार 31 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,276 वर गेला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Shivsena