मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

COVID-19: कोल्हापूरमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वॉर्डबॉयनेच केलं कृत्य

COVID-19: कोल्हापूरमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वॉर्डबॉयनेच केलं कृत्य

विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चोप दिला, संबधित वॉर्डबॉयच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चोप दिला, संबधित वॉर्डबॉयच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चोप दिला, संबधित वॉर्डबॉयच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर 21 जुलै: पनवेल आणि पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्येही (Kolhapur) संतापजनक घटना उघडकीस आली आहे. क्वारंटाइन सेटंरमध्ये (Quarantine center in kolhapur) एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी विद्यापीठातील तंत्र शिक्षण विभागातल्या सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. तिथे काम करणाऱ्या वॉर्डबॉयनेच हे कृत्य केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चोप दिला, संबधित वॉर्डबॉयच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर सेंटरमध्ये सुविधा मिळत नसल्यानेही अन्य लोकांनी इथल्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं.

एकाच वेळी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे विलगिकरण कक्षात गोंधळ उडाला आहे.

काय घडलं पुण्यात?

पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमधील महिला रूग्णांच्या विनयभंग प्रकरणी धक्कादायक बाब उघड झाली आहे. हा विनयभंग करणारा कर्मचारी हा सेंटरचा कर्मचारी असल्याचं उघड झालं आहे. लोकेश मते असं आरोपी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हा आरोपी याच कोविड सेंटरमधील कर्मचारी असून त्याने आपला मोबाइल नंबर घेऊन मेसेजही पाठवले आणि रात्री 12 वाजता रुमचा दरवाजाही ठोठावला असं तक्रारदार महिलेनं FIRमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती,  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे PI विष्णू ताम्हाणे यांनी दिली.

पुण्यात शिवसेनेला धक्का, माजी नगरसेवकाचा झाला COVID-19मुळे मृत्यू

सिंहगड कॉलेज कोविड सेंटरमध्ये काल राञी 12 वाजता एका महिला पेशंट्सच्या दारावर जोरदार धक्के मारले गेल्याचा प्रकार घडला. संबंधित महिलेनं घाबरून 100 नंबरवर कॉल करून तक्रारही केली पण पोलिसांकडे पीपीई कीट नसल्याने त्यांनी कोविड सेंटरमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली.

आज या पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. मात्र या निमित्ताने कोविड सेंटरमधील महिला पेशंट्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

18 कोटी भारतीयांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज; सर्व्हेत समोर आली धक्कादायक माहिती

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये मध्यरात्री 27 वर्षीय कोरोना बाधित महिला राहत असलेल्या रूमचा दरवाजा बाहेरून त्या व्यक्तीने जोरजोराने ठोठवल्याची घटना घडली. संपूर्ण रात्र जागूनच घाबरलेल्या अवस्थेतच त्या महिलेने काढली. सकाळी तिने ही बाब आपल्या नातेवाईकांना फोनवरून सांगितली.

त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्या महिलेला दुसऱ्या कक्षात इतर महिलांसोबत राहण्यास पाठविले.

First published: