जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / युतीची सत्ता आल्यास मुंबईत कोणाचा महापौर? शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं

युतीची सत्ता आल्यास मुंबईत कोणाचा महापौर? शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं

मुंबईत कोणाचा महापौर?

मुंबईत कोणाचा महापौर?

मुंबईत युतीची सत्ता आल्यास महापौर कोणत्या पक्षाचा होणार? यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 मे :  आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. अखेर जयंत पाटील यांच्या ईडी नोटीसीवर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जंयत पाटील यांना ईडीने नेमकी कोणत्या प्रकरणात नोटीस पाठवली? ती का आणि कशासाठी पाठवण्यात आली, याबद्दल माहित नाही, ज्यावेळी ईडी याबाबत खुलासा करेल तेव्हाच प्रकरण समोर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हटलं शंभूराज देसाई यांनी?    जयंत पाटील यांच्य ईडीनोटीसवर अखेर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  जंयत पाटील यांना ईडीने नेमकी कोणत्या प्रकरणात नोटीस पाठवली? ती का आणि कशासाठी पाठवण्यात आली, याबद्दल माहित नाही, ज्यावेळी ईडी याबाबत खुलासा करेल तेव्हाच प्रकरण समोर येईल. तपास यंत्रणा या सगळ्या स्वायत्त आहेत, त्यामुळे त्या कोणाच्या दडपानाखाली कारवाया करण्याचा प्रश्नच नसल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांवर निशाणा   दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पोपट आहेत. ते दरवेळी नवनवीन चिठ्ठ्या काढत आहेत. मात्र प्रत्येकवेळी चुकीची चिठ्ठी निघत असल्याने त्यांचा मालकही त्यांना कटांळला असल्याचा टोला शंभूराज देसाई यांना लगावला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मुंबईत कोणाचा महापौर?  यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिकेत युतीची सत्ता आल्यास कोणाचा महापौर बसणार असा प्रश्न विचारला असता याबाबत शिंदे, फडणवीस हे निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात