Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'रामदास कदम सेनेचे फायरब्रँड नेते, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

'रामदास कदम सेनेचे फायरब्रँड नेते, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

"रामदासभाई तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे. समाजाला आपली गरज आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"रामदासभाई तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे. समाजाला आपली गरज आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"रामदासभाई तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे. समाजाला आपली गरज आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

रत्नागिरी, 12 मे : "शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आहेत. रामदासभाई तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे. समाजाला आपली गरज आहे. पक्षासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपण स्वतःला झोकून देत काम केले आहे. आमदार योगेश कदम आपल्या मतदारसंघात चांगलं काम करत आहेत. त्यांना जिथे जिथे निधी लागेल तिथे निधी देण्यासाठी आपण कमी पडणार नाही. भाई आपण केवळ पुस्तके लिहण्याचा विचार न करता आपली 'सेकंड इनिंग' जोरदार सुरु करा", असे मोठे विधान राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये केले आहे.

शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लिहलेल्या 'जागर कदम वंशाचा' या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते रामदास कदम यांनी लिहलेल्या जागर कदम वंशाचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जामगे येथील कोटेश्वरी मनाई देवीच्या प्रांगणात आज मोठ्या शाही थाटात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर एकनाथ शिंदे, राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार जयंत पाटील, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले, आमदार योगेश कदम, युवा सेनेचे नेते सिद्धेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णा कदम यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

('किधर छुप्या है अमित ठाकरे..' दीपाली सय्यद यांनी आधी राज ठाकरें आणि आता मुलावर साधला निशाणा)

'रामदासभाई डोक्यात काही ठेऊ नका'

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बाबत अनेक विषयांवर बोलले. मध्यंतरीच्या कालावधीत आपण दोन पुस्तके लिहिलीत आणि तिसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आम्हाला योग मिळाला. भाई तुम्ही आता केवळ साहित्यिक बानू नका, बाळासाहेबावांच्या काळातील तुम्ही फायरब्रँड नेते आहात. तुमची आम्हाला आणि समाजाला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. भाई तुम्ही डोक्यात काही ठेऊ नका. सेकंड इनिंग जोरदार सुरु करा, अशी आमची इच्छा आहे, असे महत्वाचं विधान एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रामदास कदम यांचा पक्षातील नाराज नेत्यांमध्ये नाव आहे. अनेकवेळा अंतर्गत गटबाजीमुळे थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे. मात्र अशा पार्शवभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या विधानाने समोर जमलेल्या शेकडो लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला.

रामदास कदमांना उद्धव ठाकरेंच्या सभेचं निमंत्रण

शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशानाच्या कार्यक्रमावेळी मोठं विधान केलंय. मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळालाय. मला 14 मेच्या शिवसेनेच्या सभेचे बोलावलं आल्याची जाहीर कुबुली रामदास कदम यांनी यावेळी दिली. या सभेला मी उपस्थित राहणार नाही. मात्र त्यानंतर मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं रामदास कदमांनी सष्ट केलं. गावातल्या देवळात सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने सभेला येणार नसल्याचा रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या जवळ निरोप दिला.

First published:

Tags: Eknath Shinde, Ramdas kadam, Shiv sena