जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'किधर छुप्या है अमित ठाकरे..' दीपाली सय्यद यांनी आधी राज ठाकरें आणि आता मुलावर साधला निशाणा

'किधर छुप्या है अमित ठाकरे..' दीपाली सय्यद यांनी आधी राज ठाकरें आणि आता मुलावर साधला निशाणा

'किधर छुप्या है अमित ठाकरे..' दीपाली सय्यद यांनी आधी राज ठाकरें आणि आता मुलावर साधला निशाणा

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याविषयी एक ट्वीट केलं आहे. राज ठाकरे यांच्यानंतर त्यांनी आता अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मे- आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद ( deepali syed ) या समाज कार्यत देखील सक्रीय दिसतात. याशिवाय दीपाली सय्यद सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात. तसेच आलीकडे त्यांचा राजकारणात देखील सहभाग वाढला आहे. नुकतचं त्यांनी राज ठाकरे ( raj thackeray ) यांच्याविषयी एक ट्वीट केलं होतं, ज्यामुळं त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याविषयी एक ट्वीट केलं आहे. राज ठाकरे यांच्यानंतर त्यांनी आता अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे. सध्या त्यांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको”.या ट्वीटमधे त्यांनी रााज ठाकरे,मनसे अधिकृत आणि शिवसेनेला मेंशन केले आहे. या ट्वीटला अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, तीन चार वर्षाने मला नाही वाटत ही पार्टी टीकेल,राजू पेंटर असेल बीजीपीच्या चाकरीत आणि पोरगा असेल फुकट घरी बसलेला", अशी  प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

मागच्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून मनसे भाजपशी युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर ( raj thackeray ) टिका होत आहे. यावरूनचदीपाली सय्यद यांनी नुकतचं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही…असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लावला आहे. वाचा- ‘मी मुलांना मारहाण करते…’ धाकड गर्ल कंगनाच्या लग्नामध्ये अडथळा बनतेय ही गोष्ट दीपाली यांनी अभिनयाशिवाय राजकारणातीह प्रवेश केला आहे. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात