मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Tanaji Sawant: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

Tanaji Sawant: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

    प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 5 जून : शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत (Shiv Sena MLA Tanaji Sawant) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाला. (Shiv Sena MLA Tanaji Sawant car accident) सुदैवाने या अपघातात तानाजी सावंत यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाहीये. केवळ गाडीचं किरकोळ नुकसान जालं असल्याची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत हे भूम-परंड्याहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड येथे हा अपघात झाला. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे दोन दिवस आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. उस्मानाबादहून ते पुण्याला निघाले असताना हा अपघात झाला. घरी बसेन पण भाजपत जाणार नाही आमदार तानाजी सावंत हे नाराज असून भाजपत प्रवेश करण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेवर आमदार तानाजी सावंत यांनी शनिवारी मौन सोडलं. आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलं, मी एकवेळ घरी बसेन पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही. उस्मानाबाद येथे शिवसंपर्क अभियाना दरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे. शिवसेनेला दुय्यम वागणूक दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाणा साधला. निधी वाटपावरुनही तानाजी सावंत यांनी शिवसेनेला दुय्यम वागणूक दिल्याचं म्हटलं होतं. सोलापूर येथील एका कार्यक्रमात तानाजी सावंत म्हणाले होते, जवळपास अडीच वर्षे होत आले. अचानक सत्तांतर झालं आणि बाशिंग बांधलेले बसले. 2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंत ने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा एक वाक्य केलेलं असेल तर दाखवावे मी आत्ताच आमदारीचा राजीनामा द्यायला तयार आहे. यालाच कांड पिंकवणं असं म्हणतो, मग या पक्षाचा स्त्रोत कुठेय? यांचा चाललेला घोडा कसा आवरायचा? पक्षाला खाली कसं आणायचं? विविध पक्षांच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरुन दोन वर्षे कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी या कार्यक्रमात बोलत आहे. यापूर्वीही बोललो होतो.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Pune, Shiv sena, Solapur

    पुढील बातम्या