जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''हे दोन चार दिल्लीत जातात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात''; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

''हे दोन चार दिल्लीत जातात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात''; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

''हे दोन चार दिल्लीत जातात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात''; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल: शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे. आज किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची (Union Home Secretary) भेट घेतली. यावरुनच संजय राऊतांनी सोमय्यांवर पुन्हा टीका केली आहे. गेल्या दोन वर्षात केंद्रीय गृहसचिवांना भाजपचं शिष्टमंडळ 7 वेळा भेटून आलं. आता कुणालातरी ओठाखाली रक्त आलं आहे, त्यासाठी राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत आहेत. यांना काही ना काम ना धंदा, अशा शब्दात राऊतांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. कोणाच्या ओठाखाली थोडं रक्त आलं म्हणून भाजपचे नेते लगेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी करत आहेत. पण उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत 17 बलात्कार झाले. त्यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात ती एकत्रच लावा. ही सगळी ढोंगं चालली आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे. दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर किरीट सोमय्यांनी दिली महत्वाची माहिती हे दोन चार लोक जातात, दिल्लीत उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. हे महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे. असंच सुरु राहिलं तर या महाराष्ट्रद्रोही लोकांना नागरिक दिसतील तिथे चपला मारतील. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटायला हवे, असंही संजय राऊत म्हणालेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात