नवी दिल्ली, 25 एप्रिल: शनिवारी रात्री शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला (Union Home Secretary Ajay Kumar Bhalla) यांची भेट घेतली. या भेटीनंतर किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. दिल्लीतील विशेष टीम महाराष्ट्रात पाठवून सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी गृह सचिवांकडे (Home Secretary) करण्यात आल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जवळपास 20 मिनीटं चर्चा केल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्यांसोबत राज्य भाजपचं शिष्टमंडळ गृहसचिंवांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा यांचा समावेश होता. काय म्हणाले किरीट सोमय्या ज्या प्रकारे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्य नागरिक, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर ज्या प्रकारे हल्ले, अत्याचार सुरू आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. जिवंत गाडण्याची भाषा मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते करत आहेत. आज आम्ही अशी सात उदाहरणं गृहमंत्रालयास दिली आहेत. यावेळी केंद्र सरकारचे गृह सचिव अजय भल्ला यांच्याशी आमची बरीच विस्तृत चर्चा झाली. 20-25 मिनिटांच्या चर्चेत, त्यांच्या चेहऱ्यावर देखील चिंता दिसत होती. या संदर्भात आणखी तक्रारी इथे आलेल्या आहेत, असं दिसून आलं आहे. संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप पोलिसांच्या हजेरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गुंड मारहाण करतात, ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पांडेंनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले, त्यांची खात्यांतर्गत चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
BJP leader Kirit Somaiya writes to the Union Home Secretary in connection with the assault on him at Khar Police Station, Mumbai. pic.twitter.com/xj3AmUpZdA
— ANI (@ANI) April 25, 2022
मनसुख हिरेनची उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेले दोन पोलीस अधिकारी सुपारी घेऊन हत्या करतात. आमदार, खासदाराला जिवंत गाडण्याची धमकी दिली गेली आणि किरीट सोमय्या ज्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिलेली आहे, त्यांना पोलीस स्टेशनच्या परिसरात, पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या सहकार्यांनी शिवसेनेचे 70-80 गुंडं त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. यासाठी विशेष पथक पाठवलं पाहिजे, परिस्थिती चिंताजनक असल्याचं त्यांनी गृहसचिवांना सांगितलं. यावर गृह सचिवांनी आम्हाला आश्वस्त केलं असून हा विषय आम्ही गांभीर्यानं घेतला असून गरज पडली तर टीम देखील तिथे जाईल, असं किरीट सोमय्यांनी पत्रकारांना सांगितलं.