कोलंबो, 23 जुलै: एप्रिल 2019 रोजी ईस्टर दिवशी झालेल्या तीन चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आत्मघाती हल्ल्यातील IS दहशतवाद्याची पत्नी भारतात लपल्याचा मोठा खुलासा श्रीलंका पोलिसांनी केला आहे. अटक होण्याच्या भीतीनं पोलिसांना चकवा देत ही महिला भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी 21 एप्रिलला नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) या स्थानिक दहशतवादी संघटनेशी संबंधित 9 आत्मघातकी हल्लेखोरांनी 3 चर्च आणि काही आलिशान हॉटेलांना टार्गेट केलं होतं. ईस्टर रविवारी झालेल्या हल्ल्यात 11 भारतीयांसह 260 लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर या हल्ल्यात 500 हून अधिक लोक जखमी झाले होते. हे वाचा- कोरोना पाठोपाठ भारतावर 2 आठवड्यात आणखी एक संकट, अंतराष्ट्रीय एजन्सीकडून अलर्ट श्रीलंका पोलिसांनी कारवाई करत 200 हून अधिक संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ‘द आयलँड’ च्या वृत्तानुसार नोगॉम्बो इथल्या सेंट सेबॅस्टियन चर्चसमोर आत्मघाती हल्लेखोर अचची मोहम्मदु मोहम्मद हस्तुन याची पत्नी पुलस्तीनी राजेंद्रन उर्फ सारा सप्टेंबर 2019मध्ये समुद्रामार्ग भारतात पळून गेली. हल्लानंतर सारा फरार झाली होती. त्यानंतर ती मनकाडू इथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना चकवा देऊन ती भारतात पळाल्याची माहिती समोर आली. यासाठी साराला तिच्या भावाने आणि नातेवाईकांनी मदत केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.