मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ही काय डॅम्बिसगिरी चालू? शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीवर थेट टीका

ही काय डॅम्बिसगिरी चालू? शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीवर थेट टीका

 मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो. पण ते पळवापळवी करतात. म्हणायचे आम्ही ठाकरे सरकार आहे, पण प्रत्यक्ष नाव कोण घेतं पवार सरकार आहे'

मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो. पण ते पळवापळवी करतात. म्हणायचे आम्ही ठाकरे सरकार आहे, पण प्रत्यक्ष नाव कोण घेतं पवार सरकार आहे'

मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो. पण ते पळवापळवी करतात. म्हणायचे आम्ही ठाकरे सरकार आहे, पण प्रत्यक्ष नाव कोण घेतं पवार सरकार आहे'

दापोली, 20 मार्च : महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) निधीवरून धुसफूस अजूनही सुरूच आहे. दापोलीमध्ये शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या आमदारनिधीवरून 'ही काय डॅम्बिसगिरी चालू? ' असं म्हणत शिवसेनेचे (shivsena)  मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभ गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला दिला घरचा अहेर दिला आहे.

(बँकेत तब्बल 800 कोटींचा फ्रॉड, 20 अधिकाऱ्यांविरोधात CBI कडून कारवाई)

'आता एका आमदारावर किती भार आहे. त्याने किती गावामध्ये पाहायचे आहे. आता मला काही निवडणूक लढायची नाही, त्यामध्ये मला काही पडायचे नाही. पण मला शिंदे गावापुरते मर्यादीत कामं आहे. माझ्याकडून जेवढं होतं तेवढी काम मी करत असतो. काय स्पर्धा सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. राष्ट्रवादीवाल्यांची काय डॅम्बिसगिरी चालू आहे. नाव घ्यायला हरकत नाही' अशा शब्दांत किर्तीकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

तसंच, 'आमची काही अडचण नाही. समस्या या गाववाल्यांच्या आहेत. मुंबईमध्ये 25-15 नाही. मग यांनी फंड आणायचा कुठून ? शहरांचा निधी असतो, यूडीचा फंड असतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो. पण ते पळवापळवी करतात.  म्हणायचे आम्ही ठाकरे सरकार आहे, पण प्रत्यक्ष नाव कोण घेतं पवार सरकार आहे' असं म्हणत किर्तीकर यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीवर टीका केली.

('बायकोने मटण बनवलं नाही', नवऱ्याची 100 नंबरवर तक्रार; मग पोलिसांनी काय केलं पाहा)

'एक कामगाराचं वाक्य आहे, निदान त्यांना तरी पोहोचले. अंतर्गत निधी आहे, त्याचा प्रचंड त्रास होतोय. हा त्रास मुंबई शहरात होत नाही. इकडे त्रास आहे. योगेश कदम यांना ते सहन करावे लागते. कदम यांच्याबाजूने मी खंबीरपणे उभा आहे' असंही किर्तीकर यांनी ठामपणे सांगितलं.

First published: