जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'बायकोने मटण बनवलं नाही', नवऱ्याने डायल केला थेट 100 नंबर; मग पोलिसांनी काय केलं पाहा

'बायकोने मटण बनवलं नाही', नवऱ्याने डायल केला थेट 100 नंबर; मग पोलिसांनी काय केलं पाहा

अधिकतर वेळी नेटवर्कसंबंधी समस्या असतात. ही समस्या स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्हीमध्ये येऊ शकते. जर अशी समस्या येत असेल, तर तुम्ही फोनची नेटवर्क सेटिंग रिसेट करू शकता.

अधिकतर वेळी नेटवर्कसंबंधी समस्या असतात. ही समस्या स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्हीमध्ये येऊ शकते. जर अशी समस्या येत असेल, तर तुम्ही फोनची नेटवर्क सेटिंग रिसेट करू शकता.

बायकोने मटण बनवलं नाही याची तक्रार देण्यासाठी नवऱ्याने एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा पोलिसांना फोन केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 20 मार्च : 100… पोलिसांचा आपात्कालीन फोन क्रमांक. या नंबरवर कॉल करतात पोलीस तात्काळ सेवेत हजर होतात. पण एका व्यक्तीने या नंबरवर चक्क आपल्या बायकोने मटण न बनवल्याची तक्रार दिली आहे. एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा त्याने पोलिसांना फोन केला. त्यानंतर अशी विचित्र तक्रार येताच पोलिसांनी यावर कारवाई केली आहे (Husband police complaint against wife for not cooking mutton). नलगोंडा जिल्ह्यातील कनागल मंडलच्या चेरला गौराराम गावातील ही घटना आहे. इथं राहणारी नवीन नावाची व्यक्ती. शुक्रवारी होळीच्या दिवशी तो दारू पिऊन घरी आला. येताना तो मटण घेऊन आला. बायकोला त्याने मटण शिजवायला सांगितलं. पण त्याच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागलेल्या बायकोने मटण शिजवायला नकार दिला. सणासुदीच्या दिवशी आणलेलं मटण बायकोने बनवलं नाही म्हणून नवीनला राग आले. त्याने रागात आपला फोन घेतला आणि थेट पोलिसांना फोन केला. त्याने 100 नंबर डायल केला. हे वाचा -  तरुणांची हुल्लडबाजी, धावत्या रिक्षावर मारला वॉटर बलून; भयंकर अपघाताचा VIDEO पोलिसांनी सुरुवातीला मस्करी समजून याकडे दुर्लक्ष केलं. पण नवीन पुन्हा पुन्हा फोन करू लागला. एकदा-दोनदा नव्हे तर 6 वेळा त्याने 100 नंबर डाएल केला.त्यावेळी त्याचा कॉल रिसीव्ह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली आणि मग पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले. पोलिसांनी फोन करणाऱ्या नवीनची माहिती मिळवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याच्या घरी पोहोचले. पण नवीनने ज्या बायकोची तक्रार केली तिच्याऐवजी नवीनलाच अटक केली. कारण शासकीय, सार्वजनिक सेवेचा दुरूपयोग त्याने केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात