मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बँकेत तब्बल 800 कोटींचा फ्रॉड, 20 अधिकाऱ्यांविरोधात CBI कडून कारवाई

बँकेत तब्बल 800 कोटींचा फ्रॉड, 20 अधिकाऱ्यांविरोधात CBI कडून कारवाई

 या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले

या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले

यामध्ये बँकेच्या माजी अध्यक्षांचही नाव आहे.

नवी दिल्ली, 20 मार्च : जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) प्रशासनाच्या विनंतीवरून सीबीआयने जम्मू आणि काश्मीर बँकेच्या माजी अध्यक्षांसह एकूण 20 जणांविरुद्ध विविध गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांवर बँकेला 800 कोटींहून अधिक चुना लावण्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये अधिकतर जम्मू-काश्मीर सरकारमधील 14 अधिकारी सामील आहे. सोबतच हा लोन अवैध पद्धतीने REI एग्रो लिमिटेडला देण्याचा आरोप आहे.

सीबीआयच्या एफआयआरनुसार, हे प्रकरण 17 मार्च 2022 रोजी दाखल करण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठी तपास एजन्सी सीबीआयने जम्मू काश्मिर बँकेला 800 कोटी रुपये नुकसान करण्याच्या आरोपात बँकेचे माजी चेअरमॅन मुस्ताक अहमद शेख आणि संजय झुनझुनवालासह 20 लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यापूर्वीही जम्मू आणि काश्मीर बँकेविरोधात अनेक प्रकरणात सीबीआय आणि ईडीकडून तपास सुरू आहे.

सीबीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घोटाळ्याबाबत जम्मू काश्मीर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. ज्यानुसार, सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने आरईआय एग्रो लिमिटेडला लोन दिला आहे. जो बँकेला परत देण्यात आला नाही. तक्रारीनुसार, REI एग्रो लिमिटेड ज्याचं हेड ऑफिस कलकत्त्यात आहे आणि कॉर्पोरेट ऑफिस दिल्लीत आहे. कंपनीने J&K बँकेच्या मुंबईमधील माहिम ब्रांचकडून लोन घेण्यासाठी अर्ज केला होता. तर कंपनीची दुसरी कोणतीही ब्राँन्च मुंबईत नव्हती.

हे ही वाचा-परीक्षेची तयारी करीत होत्या दोघी बहिणी; वडिलांनी खोलीला आग लावून केली आत्महत्या

विशेष म्हणजे कंपनीची कोणतीही शाखा नसतानाही जम्मू-काश्मीर बँकेच्या माहीम शाखेने आरईआय अॅग्रो लिमिटेडला ५५० कोटींचे कर्ज दिले होते. त्याचवेळी वसंत विहार शाखेने या कंपनीला १३५ कोटी रुपये दिले. कर्ज घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप आहे. हे कर्ज REI Agro Limited ला 2011 ते 2013 दरम्यान बँकिंग व्यवस्थेशी छेडछाड करून देण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये हे कर्ज NPA म्हणून घोषित करण्यात आले, त्यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले.

First published:
top videos

    Tags: Bank details, Financial fraud, Jammu and kashmir