मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेच्या बड्या नेत्याचा जुगार अड्ड्यावर तुफान राडा; युवकानं जिंकलेली रक्कम हिसकावली अन्...

शिवसेनेच्या बड्या नेत्याचा जुगार अड्ड्यावर तुफान राडा; युवकानं जिंकलेली रक्कम हिसकावली अन्...

शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं (Shiv sena leader) जुगार अड्ड्यावर राडा (Beating at gambling den) घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं (Shiv sena leader) जुगार अड्ड्यावर राडा (Beating at gambling den) घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं (Shiv sena leader) जुगार अड्ड्यावर राडा (Beating at gambling den) घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

वर्धा, 12 सप्टेंबर: शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं (Shiv sena leader) जुगार अड्ड्यावर राडा (Beating at gambling den) घातल्याची घटना उघडकीस आली आहे. अवैध जुगार अड्ड्यावर रक्कम जिंकणाऱ्या तरुणाला आरोपींनी बेदम मारहाण केली आहे. तसेच त्याच्याकडील पैसेही हिसकावून घेतले (snatched money and beat) आहेत. विशेष म्हणजे ही संतापजनक घटना घडल्यानंतर तब्बल 24 तासांनी पोलिसांनी शिवसेनेच्या नेत्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहे.

नितीन मत्ते (Nitin Matte) असं गुन्हा दाखल झालेल्या शिवसेनेच्या नेत्याचं नाव असून तो वर्धा जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख (Shiv sena district chief) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक महिन्यापासून वरोरा शहराच्या आनंदवन चौकातील एका हॉटेलमध्ये अवैध जुगार अड्डा सुरू होता. दरम्यान 9 सप्टेंबर रोजी एका तरुणानं या जुगार अड्ड्यावर भली मोठी रक्कम जिंकली होती.

हेही वाचा- मुंबईची प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहा, साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आणि त्याच्या काही साथीदारांनी संबंधित तरुणाला अडवून बेदम मारहाण केली आहे. तसेच आरोपींनी संबंधित युवकाकडून जिंकलेली सर्व रक्कम हिसकावून घेतली आहे. 9 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडल्यानंतर वरोरा पोलिसांनी चक्क दुसऱ्या दिवशी संशयित आरोपी शिवसेना जिल्हाप्रमुखासह त्याच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-मांत्रिकाच्या मदतीनं पतीला ब्लॅकमेल करत मागितले 1कोटी; कोथरूडमधील महिलेचा प्रताप

वरोरा पोलिसांनी कलम 324, 143, 147 आणि 149 आदी कलमांतर्गत आरोपी नितीन मत्तेसह चेतन भोंगाडे, प्रतीक ताजने, मोगरा लोहकरे, सुनील बावणे अशा चार साथीदारांना अटक केली. पण काही वेळातच पोलिसांनी सर्व आरोपींची जामिनावर सुटका केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Crime news, Wardha