जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / मांत्रिकाच्या मदतीनं पतीलाच ब्लॅकमेल करत मागितले 1 कोटी; अखेर उघड झाला कोथरूडमधील महिलेचा प्रताप

मांत्रिकाच्या मदतीनं पतीलाच ब्लॅकमेल करत मागितले 1 कोटी; अखेर उघड झाला कोथरूडमधील महिलेचा प्रताप

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Pune: गेल्या काही दिवसांत पुण्यात जादूटोणा, तांत्रिक- मांत्रिकाच्या गुन्ह्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यानंतर आता आणखी एक फसवणूक आणि खंडणीचं प्रकरण समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 12 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांत पुण्यात जादूटोणा, तांत्रिक- मांत्रिकाच्या गुन्ह्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यानंतर आता आणखी एक फसवणूक आणि खंडणीचं प्रकरण समोर आलं आहे. ‘मांत्रिकाचं ऐकलं नाही तर खानदानाचा सर्वनाश होईल’, असं धमकावत पत्नीनेच पतीला ब्लॅकमेल (Wife  blackmail Husband) केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. आरोपी महिलेनं मांत्रिकाच्या मदतीनं आपल्या पतीकडे तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी (Demand Rs 1 crore) केली होती. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी पत्नीसह माहेरच्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना पुण्याच्या कोथरूड परिसरातील कुंबरे पार्क सोसायटीत घडली आहे. मागील बऱ्याच महिन्यांपासून कुटुंबाला ब्लॅकमेल करण्याचं आणि धमकावण्याचं कृत्य सुरू होतं. याप्रकरणी भूगाव येथील रहिवासी असणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीनं कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह माहेरच्या 12 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा- वडील हॉस्पिटलमध्ये दाखल सांगून 9 वर्षांच्या मुलाचं केलं अपहरण, मागितले 40 लाख,पण लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर त्याचं आरोपी पत्नीशी पटत नव्हतं. त्यामुळे ती माहेरी निघून गेली होती. पण 2014 मध्ये पुन्हा दोघांत तडजोड करण्यात आली. कुटुंबांनी समजूत घातल्यानंतर दोघंही एकत्र राहू लागले. मागील सहा वर्षे त्यांनी संसार केला. पण मार्च 2020 मध्ये पत्नीनं माहेरच्या मंडळीच्या सांगण्यावरून पतीसोबत अघोरी कृत्य करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आरोपी महिलेनं लाल कुंकू, मंतरलेले लिंबू, तांदूळ अशा गोष्टी पतीच्या अंथरुणात टाकायला सुरुवात केली. हेही वाचा- अन्नावाचून मायलेकींनी घरातच तडफडून सोडला प्राण; चंद्रपुरातील हृदय हेलावणारी घटना तसेच आपल्या ओळखीच्या देवबाप्पा नावाच्या मांत्रिकाकडे दिव्य शक्ती आहे. त्याचं ऐकलं नाही तर खानादानाचा सर्वनाश होईल, असं पत्नीनं पतीला धमकावलं. पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी संगनमत करत फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करत 1 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारू अशी धमकीही दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात