• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर शिवसेनेत खांदेपालट, भगवा फडकवण्यासाठी रणनीती

संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर शिवसेनेत खांदेपालट, भगवा फडकवण्यासाठी रणनीती

नाशिक पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सेनेची रणनीती आखण्यास सुरूवात

  • Share this:
नाशिक, 15 डिसेंबर: मुंबईसह (Mumbai) नाशिक (Nashik) महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे. त्यात नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena Leader Sanjay Raut )यांनी केला आहे. नाशिक पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सेनेची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहे. हेही वाचा...ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा बदल, सरपंच निवडीवर थेट परिणाम नाशिक पालिका क्षेत्र महानगरप्रमुखपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक जणांना डावलून सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आल्यानं नाराजीचा सूरही उमटताना दिसत आहे. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ही खांदेपालट करण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे नाशिक महापालिकेवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपनं देखील व्यूहरचना करण्यास सुरूवात केली आहे. संजय राऊतांनी दिले 'हे' संकेत... शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढवल्या जाणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. संजय राऊत यांनी नुकताच नाशिक दौरा केला. त्यांनी सांगितलं की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातीलस निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढल्या होत्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर आणि पुण्यावर महाविकास आघाडीनं ताबा मिळवला आहे. त्यामुळे आता जनतेचा कल लक्षात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा...सर्वात आधी सामान्यांना नाही तर आमदार-खासदार, VVIP ना मिळणार कोरोना लस? नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणारच... संजय राऊत म्हणाले की, मुंबईत शिवसेना हा मोठा पक्ष आहे. त्यापाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील शिवसेनेचा ताकद वाढताना दिसत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच असेल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Published by:Sandip Parolekar
First published: