• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 4 जणांना अटक

अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 4 जणांना अटक

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाले होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाले होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाले होते.

  • Share this:
अमरावती, 22 नोव्हेंबर : अमरावती शहरात 12 आणि 13 तारखेला झालेल्या हिंसाचार प्रकरणी (amravati violence) अटकसत्र सुरूच आहे. भाजप नेत्यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेच्या (shivsena) नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये 13 तारखेच्या बंदच्या मोर्चात भाजप व हिंदुत्ववादी संघटना यांचा सहभाग होता. त्याच वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाले होते. प्रचंड घोषणाबाजी, नारेबाजी आणि चिथावणीखोर भाषणे केली असा पोलिसांचा आरोप आहे. ही मॉडेल भरते श्रीमंतांच्या पार्टीत रंग, लाखो रुपये घेऊन बनते ‘खास पाहुणी’ सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह चार शिवसैनिकांना अटक केली आहे. दंगलीत शिवसेना सहभागी असूनही पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा पोलिसांवर सातत्याने आरोप होत होता. त्यानंतर आज अटकेची कारवाई झाली. VIDEO - लग्नाआधी नवरीबाईची ढोलेशोले बनवायची घाई; नटूनथटून आधी जीम गाठली काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यासह 14 जणांना अटक केली होती. या 14 जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर भाजप नेते आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) यांच्यासह दहा जणांवर अटकेची कारवाई केली होती. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची भाजपाची मागणी दरम्यान, राज्य सरकारच अपयश झाकण्यासाठी 12  नोव्हेंबरची दंगल घडवण्यात आली का असा संशय व्यक्त करत , दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. नांदेड, अमरावती, मालेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात अनिल बोंडे हे देखील सहभागी झाले होते.
Published by:sachin Salve
First published: