मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - नवरीबाई जोमात! लग्नाआधी डोलेशोले बनवायची घाई; साडी नेसून, नटूनथटून आधी जीम गाठली

VIDEO - नवरीबाई जोमात! लग्नाआधी डोलेशोले बनवायची घाई; साडी नेसून, नटूनथटून आधी जीम गाठली

नवरीबाई जीममध्ये घाम गाळताना दिसली.

नवरीबाई जीममध्ये घाम गाळताना दिसली.

नवरीबाई जीममध्ये घाम गाळताना दिसली.

मुंबई, 21 नोव्हेंबर : लग्न (Wedding video) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो आणि हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो. यासाठी काही लोक काही ना काही तरी हटके करत असतात (Bride groom video). सध्या असंच काहीतरी हटके करणाऱ्या एका नवरीबाईचा (Bride video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरीबाई लग्नाआधी थेट ढोलेशोले बनवताना दिसली (Bride doing exercise video).

लग्न म्हटलं की सामान्यपणे नवरीची कपडे, दागिने खरेदीची घाई असते. मेकअप, फोटोशूट याची तयारी असते. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील नवरीला मात्र डोलेशोले बनवण्याची घाई आहे. लग्नाआधी या नवरीबाईने थेट जीम गाठली (Bride at gym video). तिथं ती चक्क एक्सरसाइझ करताना दिसली. साडी नेसून, दागिने घालून, नटूनथटून ही नवरी जीममध्ये घाम गाळू लागली (Bride doing excercise in gym).

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टनुसार हा व्हिडीओ प्री-वेडिंग शूटचा आहे (Pre wedding video). म्हणजे ही नवरी फिटनेस फ्रीक आहे आणि ती जीममध्येच प्री-वेडिंग शूट करताना दिसते आहे. हिमतीचं आज गुपित उलगडलं असं मजेशीर कॅप्शनही त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत पाहिल्यानंतर तशाच मजेशीर प्रतिक्रियाही येत आहे. काही नेटिझन्सनी या नवरीचं कौतुकही केलं आहे.

हे वाचा - नवरी-नवरदेवाचा आगळावेगळा अंदाज; स्टेजवरच केलं असं काही की आले चर्चेत, पाहा VIDEO

लग्न तोंडावर असताना अशी एक्सरसाइझ करताना दिसणारी ही पहिली नवरी नाही. याआधीसुद्धा एक नवरी अशीच एक्सरसाइझ करताना दिसली होती. लग्नासाठीनवरी पूर्णपणे तयार झाली की शेवटी मेकअपचा एक टचअप असतो. पण या नवरीने तर टचअप करणं सोडून पुशअप्स मारायला सुरुवात केली. या नवरीला मेकअप नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे.

View this post on Instagram

A post shared by aana arora (@aan4490)

aan4490 व्हिडीओत पाहू शकता, नवरी पूर्ण तयार झाली आहे. तिने दागिने घातले आहेत आणि सुंदर असा लेहंगाही घातला आहे. पण अशी तयार होऊन ती एखाद्या बाहुलीसारखी किंवा इतर नवरीसारखी लाजत मुरडत किंवा स्वतःला आरशात पाहत बसली नाही तर तिने आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवले आणि पुशअप्स मारायला सुरुवात केली.

हे वाचा - असं Pre wedding shoot पाहिलं नसेल; 85 लाखापेक्षाही जास्त लोकांनी पाहिलेला VIDEO

नटूनथटून आपल्याच लग्नाच्या दिवशी नवरीने पुशअप्स मारल्या. त्यातही विशेष म्हणजे लग्नाचा लेहंगा म्हटला की तो इतका जड असतो की सावरत साधं चालणंही शक्य होत नाही. पण याच लेहंग्यावर ही नवरी पुशअप्स मारताना दिसली. त्यामुळे तिचं जास्तच कौतुक वाटतं आहे.

First published:
top videos

    Tags: Bride, Pre wedding photo shoot, Viral, Viral videos, Wedding, Wedding video