मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ही मॉडेल भरते श्रीमंतांच्या पार्टीत रंग, लाखो रुपये घेऊन बनते ‘खास पाहुणी’

ही मॉडेल भरते श्रीमंतांच्या पार्टीत रंग, लाखो रुपये घेऊन बनते ‘खास पाहुणी’

लाखो रुपये घेऊन श्रीमंतांच्या पार्टीत (A girl works as an atmosphere model and earns millions per day) येणारी आणि उपस्थितांना रिझवणारी एक मॉडेल काही वर्षातच प्रचंड श्रीमंत झाल्याची घटना सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी आहे.

  • Published by:  desk news

लाखो रुपये घेऊन श्रीमंतांच्या पार्टीत (A girl works as an atmosphere model and earns millions per day) येणारी आणि उपस्थितांना रिझवणारी एक मॉडेल काही वर्षातच प्रचंड श्रीमंत झाल्याची घटना सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी आहे. एकेकाळी पैशांची प्रचंड चणचण भासत असलेल्या या मॉडेलनं पार्टी मॉडेलिंगच्या नव्या करिअरबाबत ऐकलं (New career in the modelling) आणि स्वतःला त्यासाठी तयार करत झोकून दिलं. थोड्याच दिवसांत अनेक श्रीमंतांकडून त्यांच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी तिला ऑफर येऊ लागल्या आणि तिची गरीबी बघता बघता संपून गेली.

View this post on Instagram

A post shared by erica (@itstheerica)

पार्टी आणि एरिका

अमेरिकेतील ऑरगन शहरात राहणाऱ्या या 24 वर्षांच्या मॉडेलचं नाव आहे एरिका नॉर्थ. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय तरुणांची जी जी स्वप्नं असतात, ती सगळी एरिकानं आत्ताच पूर्ण केली आहेत. स्वतःच्या बेरोजगारीवर उत्तर शोधता शोधता ऍटमॉस्फिअर मॉडेलिंग (Atmosphere Modelling) या क्षेत्रात तिनं मोठं करिअर घडवलं आहे.

शाही पार्ट्यांमध्ये मिळतं आमंत्रण

आपल्या पार्टीचा दर्जा वाढावा आणि निमंत्रित पाहुण्यांच्या पाहुणचाराची योग्य काळजी घेतली जावी, यासाठी अनेक श्रीमंतांकडून एरिकाला पार्टीसाठी बोलावलं जातं. तिचं काम असतं आकर्षक दिसणं आणि पाहुण्यांसोबत पार्टी एंजॉय करणं. आपली जबाबदारी मुख्यत्वे दोन गोष्टींची असल्याचं एरिका सांगते. पहिलं म्हणजे पार्टीला आलेले पाहुणे पार्टी एंजॉय करत आहेत की नाही, हे पाहणं आणि दुसरं म्हणजे दैनंदिन आयुष्यापेक्षा या पार्टीत त्यांना काही वेगळेपण वाटतंय की नाही, हे तपासणं. त्यासाठी त्यांच्यासोबत गप्पा मारणं, त्यांना ड्रिंक तयार करायला मदत करणं, कंपनी देणं यासारख्या गोष्टी करून एरिका पार्टीत जान आणते. प्रत्येक पार्टीत उपस्थित राहण्यासाठी तिला लाखो डॉलर ऑफर केले जातात.

हे वाचा- विचित्र! सँडविच खाल्ल्यामुळे महिला थेट ICU मध्ये, थोडक्यात वाचला जीव

एरिका फिजिकल होते?

हे करत असताना आपल्याला कधीही फिजिकल होण्याची गरज पडली नसल्याचं ती आवर्जून सांगते. आजवर आपल्याकडे कुणीही तशी मागणी केली नाही किंवा त्यासाठी कुठली ऑफरही दिली नाही. प्रत्येकाने आपल्या प्रोफेशनचा आदर राखून आपल्यासोबत सन्मानपूर्वकच वर्तणूक केल्याचा अनुभव एरिकाने शेअर केला आहे.

First published:

Tags: America, Lifestyle, Model, Party