जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जालन्यात सोसायटी निवडणुकीत शिवसैनिकाकडून काँग्रेस आमदाराचा दारुण पराभव

जालन्यात सोसायटी निवडणुकीत शिवसैनिकाकडून काँग्रेस आमदाराचा दारुण पराभव

जालन्यात सोसायटी निवडणुकीत शिवसैनिकाकडून काँग्रेस आमदाराचा दारुण पराभव

पानशेंद्रा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत एका सर्वसामान्य शिवसैनिकाने विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा 21 मतांनी पराभव केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 19 जून : पानशेंद्रा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत एका सर्वसामान्य शिवसैनिकाने विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा 21 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचे प्रभाकर वामनराव विटेकर यांनी जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झालेल्या मतदानानंतर सायंकाळी या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. पानशेंद्रा विविध कार्यकारी सोसायटीच्या 13 जागांसाठी आज निवडणूक घेण्यात आली. सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरांट्याल आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे बंधू संजू खोतकर निवडणुकीत समोरासमोर उभे टाकल्याने दोघांचीही प्रतिष्ठापणाला लागली होती. शिवसेनेचे प्रभाकर वामनराव विटेकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी 21 मतांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला. तर दुसर्‍या जागेवर खुल्या प्रवर्गातून संजय खोतकर यांनी गोरंट्याल यांचा पराभव केलाय. ( महिलेला जातीवाचक शिवीगाळ, अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप, करुणा शर्मावर पुण्यात गुन्हा दाखल ) शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर आणि आमदार कैलास गोरंट्याल हे सकाळपासूनच निवडणूक स्थळी कार्यकर्त्यांसह ठाण मांडून होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेने 13 जागांसाठी पॅनल दाखल केले होते. तर राष्ट्रवादी आणि भाजपने या निवडणुकीत कोणताही उमेदवार दिला नव्हता. दरम्यान, गावपातळीवरील या निवडणुकीत शिवसेनेचा पूर्ण पॅनल निवडून आला तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला. काँग्रेस आमदार भीतीपोटी दोन जागेवर उभे होते. परंतु दोन्ही जागेवर त्यांना धूळ चारली. मला ग्रामपंचायत निवडणूक जिंकून दाखवा, असं मला आव्हान देणाऱ्या आमदारांना नियतीने आज सध्या सोसायटीच्या निवडणुकीत पराभवाची चव चाखवली, अशी खोचक टीका माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: shivsena
  • First Published :
जाहिरात
जाहिरात