Home /News /maharashtra /

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप, करुणा शर्मावर पुण्यात गुन्हा दाखल

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप, करुणा शर्मावर पुण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे, 19 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करुणा यांच्यासह, अजय देडे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित 32 वर्षीय महिलेने अनैसर्गिक अत्याचार आणि कौटुंबिक छळाची तक्रार पुण्याच्या येरवाडा पोलीस ठाण्यात केली आहे. याच तक्रारी प्रकरणी करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करुणा शर्मा यांनी पीडितेस हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. पीडितेने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा यासाठी करुणा शर्मांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तर पीडितेचा पती अजय कुमार विष्णू देडे याने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, अशी तक्रार फिर्यादी महिलेने दिली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (देशभरातून 40 हजार काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीला धडकण्याच्या तयारीत) संबंधित प्रकरणात पोलिसांनी भा द वि कलम 498 (अ), 377, 323, 504, 506 (2), 34 अनुसुचित जाती व जमाती अत्याचारास प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(R)(S) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. करुणा शर्मा कोण आहे? करुणा शर्मा ही महिला स्वत:ला धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचं म्हणते. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनीदेखील गेल्यावर्षी फेसबुक पोस्ट टाकून आपण करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं कबूल केलं होतं. तसेच त्यातून आपल्याला दोन अपत्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मोठा गदारोळ झाला होता. करुणा शर्माची बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर करुणा शर्मा अनेकवेळा चर्चेत आल्या.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या