सोलापूर, 10 जुलै: राज्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यात सोलापुर शहरात शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा... तुकाराम मुंढेंनी घोटाळा केला, महापौर संदीप जोशींची न्यायालयात धाव
कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांना पोलिसांनी चक्क फरपटत नेत गाडीत टाकले. पोलिसांकडून वाहन चालकांवर कारवाई सुरू असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे फौजदार चावडी परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, प्रदेश सरचिटणीसला नेलं फरपटत#shivsena pic.twitter.com/NA2XBfqgKJ
— News18Lokmat (@News18lokmat) July 10, 2020
पोलिस कारवाईसाठी आक्रमक
दुसरीकडे, पोलिसांनी विनामास्क, विनाकारण डबलसीट फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्र केली आहे. परंतु अजूनही काही नागरिक मास्कचा वापर न करता तसेच मोटारसायकलवर डबलसीट फिरताना दिसत आहे. पोलिस संपूर्ण शहरात वाहन चालकांवर कारवाई करत आहेत.
पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी कारवाईत आतापर्यंत 1399 वाहने तपासण्यात आली तर 285 वाहनधारकांवर कारवाई झाली. शहरातील सात पोलिस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या 8 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
कोरोना संसर्गावर निर्बंध घालण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा...स्वत:च्याच घरात अभिनेत्रीचा बलात्कार, आरोपीकडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व हॅण्डग्लोज न वापरणे, रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकण्यावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील महापालिका झोननिहाय ही कारवाई करण्यात आली.