Home /News /entertainment /

स्वत:च्याच घरात अभिनेत्रीचा बलात्कार, आरोपीकडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

स्वत:च्याच घरात अभिनेत्रीचा बलात्कार, आरोपीकडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पश्चिम बंगालच्या बिजॉयगडमध्ये 26 वर्षीय अभिनेत्री-मॉडेलचा तिच्याच घरामध्ये बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे. जादवपूर पोलीस ठाण्यात अभिनेत्रीने तक्रार नोंदवली आहे.

    कोलकाता, 10 जुलै : सध्या संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. अशावेळी प्रत्येक जण इतरांना मदत करण्याची भावना बाळगत आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या बिजॉयगडमध्ये 26 वर्षीय अभिनेत्री-मॉडेलचा तिच्याच घरामध्ये बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे. जादवपूर पोलीस ठाण्यात अभिनेत्रीने तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. अभिनेत्रीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. 'साथ भाई चम्पा' यांसारख्या स्थानिक लोकप्रिय मालिकांमध्ये या अभिनेत्रीने काम केले आहे. अमर उजालाने याबाबतचे वृत्त दिले आहे. संताप आणणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्रीच्या ओळखीच्या माणसानेच हे दुष्कर्म केल्याचा तिचा आरोप आहे. आर्थिक मदत मागण्यासाठी घरी आलेल्या त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अभिनेत्री त्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत असल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. अभिनेत्रीने असा आरोप केला आहे, आरोपी एवढे करून थांबला नाही त्याने या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. (हे वाचा- मीडिया अहवालानुसार पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, या इसमाविरोधाच भादवी कलम 376/506 अंतर्गत आरोप दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी एक व्यावसायिक असून या दोघांमध्ये प्रेमसंबध होते असल्याचीही चर्चा आहे. मुळची नादियाची असणारी ही अभिनेत्री मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर बनवण्यासाठी कोलकातामध्ये आली होती. काही मीडिया अहवालानुसार संशयित आरोपी आणि तिच्यामध्ये सुरूवातीला चांगले संबंध होते. मात्र कालांतराने ते बिघडू लागले. लॉकडाऊन काळात या इसमाने तिला फेसबुकवर मेसेज करून भेटण्यासंदर्भात विचारले मात्र त्याला तिने नकार दिला. त्यानंतर त्याने व्यवसायात नुकसान झाल्याचे कारण देत आर्थिक मदती मागितली. तेव्हा अभिनेत्रीने त्याला घरी बोलावले. यावेळी त्यानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीकडून केला जात आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या