मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान' संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

'निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान' संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide Controversial statement: संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sambhaji Bhide Controversial statement: संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sambhaji Bhide Controversial statement: संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

    सांगली, 15 ऑक्टोबर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निर्लज्ज नागरिकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असल्याचं वादग्रस्त वक्तव्य (Sambhaji Bhide controversial statement) त्यांनी सांगलीत (Sangli) केलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संपूर्ण जगभरात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आपला देश आहे. आपला क्रमांक एक आहे... कशात? निर्लज्जापणात. जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, गुलामी दास्याच्या ननरकात राहण्याचा बेशरमपणाचा वाचटत नाही, लाज वाटत नाही अशा 123 कोटी लोकांचा देश जगात आहे. प्रदीर्घ काळ, परक्यांचा मार खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. दुर्गामाता दौडीला परवानगी नाकारल्याने संभाजी भिडे हे महाविकास आघाडी सरकारवर संतापले. यावरुन संभाजी भिडे म्हणाले, दारूची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते हे बशरम, नायालयक आहेत. प्रभू रामचंद्र विवेक हरवून ज्याप्रमाणे सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवला आहे. वाचा : 'शस्त्रं कधी, कुणासाठी काढायची असतात हे उद्धव ठाकरेंच्या संध्याकाळच्या भाषणातून कळेल' संजय राऊतांचा सूचक इशारा दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी नाकारली आणि हेच राज्यकर्ते लॉकडाऊन झाल्यावर 21व्या दिवशी महसूल वाढावा म्हणून राज्यातील सर्व दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देतात. आम्हाला दुर्गामाता दौड करण्यास परवानगी नाकारतात. हे बेशरम आणि नालायक राज्यकर्ते आहेत असंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. कोरोना बाबत काय म्हणाले संभाजी भिडे? संभाजी भिडे यांनी म्हटलं, कोरोना हा चीनने आपल्याला पालथे पाडणयासाठी केलेलं बदमाशी कृत्य आहे. कोरोना काल्पनिक असून ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग आहे. कोरोना आहे हे थोतांड आहे. संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले... संजय राऊत म्हणाले, आज विजयादशमी आहे... आज आपण शुभ बोललं पाहिजे. अजून तरी या देशातील लोकांनी लाज सोडलेली नाहीये. अजून तरी या देशाने लाज सोडलेली नाहीये. हे 2024 च्या निवडणुकीत तुम्हाला स्पष्ट दिसेल. यापूर्वीही संभाजी भिडेंनी केलं आहे वादग्रस्त वक्तव्य 'कोरोना अस्तित्वात नाही. सरकारने काहीही करू नये, ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही,' असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये केलं होतं. काय म्हणाले होते संभाजी भिडे? 1. अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कूट अंधारात शोधण्यासारखा कोरोना रोगाचा प्रकार 2. कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे, प्रत्येकाच्या जीवाची काळजी जो तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये 3. कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा, कोरोना- कोरोना आक्रोश चालला आहे... पण कोरोना अस्तित्वात नाही, लॉकडाऊनची गरज नाही. 4. केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार...जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील 5. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे, नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील 6. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: India, Sangli

    पुढील बातम्या