मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sambhaji Bhide यांची जीभ घसरली; एकाच वेळी 6 वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड

Sambhaji Bhide यांची जीभ घसरली; एकाच वेळी 6 वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड

सांगलीमध्ये (Sangali News) बोलताना संभाजी भिडे यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे.

सांगलीमध्ये (Sangali News) बोलताना संभाजी भिडे यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे.

सांगलीमध्ये (Sangali News) बोलताना संभाजी भिडे यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे.

सांगली, 8 एप्रिल: वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide Controversial Statements in Sangali) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. 'कोरोना अस्तित्वात नाही. सरकारने काहीही करू नये, ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही,' असं म्हणत सांगलीमध्ये (Sangali News) बोलताना संभाजी भिडे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती झाली असून कुटुंबातील कर्त्या व्यक्तींच्या निधनाने अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच संभाजी भिडे यांनी मात्र बेजबाबदार वक्तव्य करत वाद ओढवून घेतला आहे.

हेही वाचा - 'कठोर निर्बंध आवश्यक', कोरोनाबाबत शरद पवारांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांसह सर्वांनाच केलं खास आवाहन

लॉकडाऊनच्या विरोधात सांगलीमध्ये भाजपकडून मोर्चा आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यासह विविध भाजीपाला आणि व्यापारी संघटनाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी केलेली वक्तव्ये राज्यभरात चर्चेचा विषय झाली आहेत.

नक्की काय म्हणाले संभाजी भिडे?

1. अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कूट अंधारात शोधण्यासारखा कोरोना रोगाचा प्रकार

2. कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे, प्रत्येकाच्या जीवाची काळजी जो तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये

3. कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा, कोरोना- कोरोना आक्रोश चालला आहे... पण कोरोना अस्तित्वात नाही, लॉकडाऊनची गरज नाही.

4. केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार...जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील

5. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे, नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील

6. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही

First published:
top videos