जयपूर 11 जुलै: मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्यानंतर आता भाजपची नजर आता राजस्थानवर लागली आहे. राजस्थानच्या (Rajasthan Politics) राजकारणातही आता आरोप-प्रत्यारोपांनी वादळ निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Cm Ashok Gehlot) यांनी थेट भाजपवरच (BJP) खळबळजनक आरोप केला आहे. भाजपने सरकार पाडण्यासाठी काँग्रेस आमदारांना 15 कोटीची ऑफर दिल्याचा आरोप मुख्यमंत्री गहेलोत यांनी केला आहे. देशात कोरोनाचं संकट असताना भाजप राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असंही ते म्हणाले.
गेहलोत म्हणाले, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपने अशा प्रकारे आमदारांना प्रलोभन देऊन सरकार पाडलं होतं. आता राजस्थानमध्येही भाजप तोच खेळ खेळत आहे. काँग्रेसच्या दोन डझन आमदारांनी एक संयुक्त पत्रक काढून भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला.
राजस्थानमध्ये खुशवीर सिंह जोजावर, सुरेश टाक आणि ओम प्रकाश हुडला या तीन अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेची चौकशी राजस्थान पोलीस करत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचं समर्थन केलं होतं. राजस्थान विधानसभेच्या 200 जागांपैकी 107 जागा काँग्रेसकडे असून 12 अपक्ष आमदारांचं समर्थनही काँग्रेसला मिळालं आहे.
संतापजनक! मास्क घालण्यास सांगितले म्हणून प्रवाशांकडून मारहाण, ड्रायव्हरचा मृत्यू
मात्र काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे अस्वस्थ असल्याचं कायम बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये असंतोष असल्याचीही चर्चा आहे. त्याचाच फायदा घेण्याचा भाजप करत असल्याचंही बोललं जात आहे.
राजस्थान के CM अशोक गहलोत ने BJP पर सरकार को गिराने की साजिश रचने का आरोप लगाया.@gayatrisharma24 pic.twitter.com/6ATC02ixwy
— News18 India (@News18India) July 11, 2020
विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या वेळीही राजस्थानमध्ये नाराजी नाट्य रंगलं होतं. युवा नेते असलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळेल असं वाटलं होतं. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी अशोक गेहलोत या अनुभवी नेत्याला पसंती दिली. त्यामुळे सचिन पायलट नाराज होते.
नंतर त्यांची समजून घालून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. तेव्हापासून पक्षात धुसफूस सुरूच असल्याची चर्चा आहे.