मुंबई, 11 जुलै: बहुचर्चित कानपूर पोलिस हत्याकांड प्रकरणातील गॅंगस्टर विकास दुबे याच्या एका साथिदाराला मुंबईत अटक करण्यात आली आहे. अरविंद उर्फ गुडड्न रामविलास त्रिवेदी (वय-46) असं आरोपीचं नाव असून त्याचा वाहनचालक सुशिलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं (एटीएस) ही कामगिरी केली आहे तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी दोन्ही आरोपींच्या ठाण्यात मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा...पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या
दरम्यान, 3 जुलैला मध्यरात्री उत्तर प्रदेशातील कानपूरमधील बिकरू गावात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यासाठी पोलिस पथक गेलं होतं. विकास दुबे आणि त्याच्या साथिदारांना पोलिसा पथकावर तूफान गोळीबार केला होता. त्यात पोलिस अधिकाऱ्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला होता तर अनेक कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर विकास दुबे आणि त्याचे साथिदार फरार झाले होते.
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी विकास दुबे याचा एन्काऊंटर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी मुंबईत त्याचे दोन साथिदारांना मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे.
ATSनं अशी केली कारवाई...
कानपूर पोलिस फायरिंग केसमधील वॉन्टेड आरोपी गुड्डन त्रिवेदी हा ठाण्यात लपला असल्याची गोपनिय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी आपल्या पथकासह ठाण्यातील कोलशेत रोड येथे एका घरावर छापा टाकून आरोपी अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा वाहनचालक सोनू तिवारीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी गुड्डन त्रिवेदीवर शासनाने रोख रकमेचं बक्षीस जाहीर केलेलं आहे.
राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येची दिली कबुली..
पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2001 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येची कबुली आरोपी गुड्डन त्रिवारी यानं दिली आहे. तसेच विकास दुबे याच्यासोबत अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचं आरोपीनं पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी, तीन चोरट्यांकडे सापडल्या तब्बल 24 बाईक्स
अप्पर पोलिस महासंचालक, देवेन भारती यांच्या आदेशानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलिस उपआयुक्त विक्रम देशमाने, विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.