जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ठाकरेंचे आमदार रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि...'; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

'ठाकरेंचे आमदार रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि...'; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

'ठाकरेंचे आमदार रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि...'; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे गटामध्ये राहिलेले 14-15 आमदार त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार रात्रीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात, असा गौप्यस्फोट खासदार जाधव यांनी केला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंदारे, बुलडाणा 09 नोव्हेंबर : राज्यातील राजकारणात मागील काही महिन्यांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढत गेल्या. आता ठाकरे गटातील नेते सातत्याने शिंदे गटावर टीकास्त्र सोडताना दिसतात. मात्र, आता नुकतंच शिंदे गटाच्या खासदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. बुलडाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. बहिणीवर वादग्रस्त टीका, तरी दादा शांत का? अजित पवारांच्या मनात नेमकं काय? उद्धव ठाकरे गटामध्ये राहिलेले 14-15 आमदार त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार रात्रीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. यासोबतच मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. हे स्वतः मी पाहिलं असून आमच्या संपर्कात हे आमदार आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सर्वच ठाकरे गटातील आमदार आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार अस्वस्थ आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश हा शिंदे गटात होईल. आगामी निवडणूकीपूर्वी त्यांचा शिंदे गटात प्रवेश होईल, असा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केला असून खळबळ माजवून दिली आहे. अब्दुल सत्तारांचे कपडे फाडा, अन्… आता राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरली! दरम्यान, सोयाबीनच्या भावामध्ये होणाऱ्या वाढीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सोयाबीनसह तेलबियावरील निर्बंध केंद्र सरकारने उठवल्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होत आहे. त्याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात