जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, 'कोणताही निर्णय घेताना ते...'

शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, 'कोणताही निर्णय घेताना ते...'

uddhav news

uddhav news

पारदर्शी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यातही उद्धव ठाकरे मागेपुढे करत होते. मात्र शिंदे सरकारने सर्व निर्णयाला तात्काळ गती दिली आहे, असं चिमणराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नंदुरकर, जळगाव 22 ऑक्टोबर : शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सुस्तपणा आणि नि- निर्णायक अवस्था होती, अशी टीका त्यांनी केली आहे. पारदर्शी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यातही उद्धव ठाकरे मागेपुढे करत होते. मात्र शिंदे सरकारने सर्व निर्णयाला तात्काळ गती दिली आहे, असं चिमणराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले. शिंदे गटात वादाची ठिणगी! ‘सरकार येतं आणि कोसळतंही..भान ठेवा’; आमदाराने आपल्याच मंत्र्याला सुनावलं यासोबतच राज्याची काळजी आणि कळकळा असलेले मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचं मत चिमणराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत चिमणराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यातही मागेपुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चिमणराव पाटील यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं असलं तरी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर मात्र त्यांनी निशाणा साधला आहे. आपल्याच पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याची कामं दिल्याने चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात संघर्ष वाढला आहे. बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा पाहून धनंजय मुंडे संतापले, सरकारला दिला थेट इशारा, म्हणाले… आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर तोंडसुख घेतलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील शूद्रपणा करू नये, असा टोला आमदार चिमणराव पाटील यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले, की मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खाजगी मालमत्ता नाही. सरकार आलं म्हणून तुम्ही मंत्री आहात याचं भान ठेवा, असं म्हणत आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबरावांवर निशाणा साधला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात