नितीन नंदुरकर, जळगाव 22 ऑक्टोबर : जळगावात शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. पाणीपुरवठ्याच्या कामावरुन चिमणराव पाटील नाराज झाले आहेत. आपल्याच पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याची कामं दिल्याने चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात संघर्ष वाढला आहे.
अवघ्या 7 मिनिटात उरकला कृषीमंत्र्यांचा नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा.. यानंतर आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर तोंडसुख घेतलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील शूद्रपणा करू नये, असा टोला आमदार चिमणराव पाटील यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले, की मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खाजगी मालमत्ता नाही. सरकार आलं म्हणून तुम्ही मंत्री आहात याचं भान ठेवा, असं म्हणत आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबरावांवर निशाणा साधला आहे. चिमणराव पाटील म्हणाले, की ‘सरकारमध्ये आपण काम करतो तेव्हा ते सरकार बनवण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकाचं योगदान असतं. एका-एका मतावर सरकार येतं आणि कोसळतंही. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारसारखं. त्यामुळे मंत्री झालं म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते. याचं भान ठेवा’ Rohit Patil NCP : राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांना तगडा झटका, नगरसेवक फुटल्याने सत्ता संपुष्टात एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर काही महिन्यांपूर्वीच राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं आहे. अशात आता शिंदे गटाच्या आमदारांमध्येच धुसफूस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याच गटातील आमदार आणि मंत्र्यांचा संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा थांबवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे .