मुंबई 06 सप्टेंबर : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विदर्भावर लक्ष केंद्रित करण्याचा प्लॅन आखला आहे. नवरात्रीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष बांधणीच्या दृष्टीने दौरा करणार असल्याचं समोर आलं आहे. यादरम्यान नागपूर आणि अमरावती येथे दोन मोठे मेळावे एकनाथ शिंदे घेणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यावर एक मोठा धमाका विदर्भातून होणार आहे अशी माहिती समोर येत आहे. अखेर नाराज संजय शिरसाट यांनी विचार बदलला, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला निघाले विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यावर एक मोठा धमाका विदर्भातून होणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे विदर्भातील नेते किरण पांडव यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिंदे यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी, उद्याच घटनापीठ स्थापन होणार! शिंदे गटाच्या नागपूर विभागातील प्रमुख नियुक्त्या नागपूर लोकसभा संपर्क - मंगेश काशीकर नागपूर शहर जिल्हा प्रमुख - संदीप इटकेलवार चंद्रपूर जिल्हाप्रमुख - नितीन मते चंद्रपूर सह संपर्कप्रमुख - बंडू हजारे भंडारा जिल्हाप्रमुख - अनिल गायधने गोंदिया जिल्हा प्रमुख - मुकेश शिवहरे व सुरेंद्र नायडू वर्धा जिल्हा प्रमुख - गणेश ईखार गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख - संदीप बरडे गडचिरोली सहसंपर्क प्रमुख - हेमंत जांभेवार शिवसेनेत प्रत्येक जिल्ह्यात दोन जिल्हा प्रमुख आणि महापालिकेच्या ठिकाणी दोन शहर प्रमुख नेमले जातात. मात्र, शिंदे गटाने असं न करता एकच जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.