नाशिकमध्ये महिला पेट्रोलमुळे 67 टक्के भाजली, पण जबाब देताना पीडितेची पोलिसांना खळबळजनक माहिती

पहाटे 3च्या सुमारास पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं डॉक्टरांनी तिला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहाटे 3च्या सुमारास पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं डॉक्टरांनी तिला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
नाशिक, 16 फेब्रुवारी : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर प्रेमसंबंधातील वादातून एका 30 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ही महिला 67 टक्के भाजली असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला आज मुंबईत हलविण्यात येणार आहे. पहाटे 3च्या सुमारास पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं डॉक्टरांनी तिला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील भायखळा इथल्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. या पीडित महिलेला 3 अपत्ये आहेत. महिलेच्या पहिल्या पतीचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर रामेश्वर मधुकर भागवत याचेशी दोन महिन्यापूर्वीच निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिरात विवाह केला होता. त्यानंतर संशयित आरोपी रामेश्वर पुन्हा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं समजल्यानं गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जातं आहे. इतर बातम्या - केजरीवाल तिसऱ्यांदा घेणार CM पदाची शपथ, रामलीला मैदानात 1 लाख लोकांची उपस्थिती प्राथमिक माहितीनुसार, या महिलेला पेटवून दिल्याचं सांगितलं जात असलं तरी आपसातील वादातून तिने स्वत:च बाटलीत आणलेल्या पेट्रोलनं स्वत:ला पेटवून घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नेमकं तिला पेटवलं गेलं की तिने स्वत:च पेटवून घेतलं, या बद्दल तपास करणाऱ्या पोलिसांनाही शंका आहे. यात कसून तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित महिलेची गोंधळात टाकणारा जबाब या संपूर्ण प्रकरणाविषयी पीडित महिलेला विचारलं असता, 'पतीचा मला पेटवण्याचा उद्देश नव्हता. हा एक अपघात आहे. आमच्यात सकाळपासून वाद सुरू होता. मी बस स्थानकाजवळ स्कुटीमध्ये पेट्रोल भरत होते. तेव्हा तो आला आणि पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर तो मला म्हणाला की दे मी पेट्रोल गाडीत भरतो. अशात दोघांच्या भांडणात दोघांच्याही अंगावर पेट्रोल सांडलं. त्यानंतर त्याने माचीसची काडी ओढली पण ती माझ्या बाजुला आली आणि त्यावेळी तो घाबरून पळून केला.' पीडितेच्या या जबाबामुळे संपूर्ण प्रकरण गोंधळात आहे. यावर आम्ही सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यापासून रात्री उशिरार्पयत तिचा जबाब घेण्याचे काम सुरू होते. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पीडित महिलेला अधिक उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात सायंकाळी दाखल केल्यानंतर दीड तास उलटून गेले तरी तिच्या कुटुंबातील एकही सदस्य रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई घरच्यांवरही आहे. इतर बातम्या - Bigg Boss 13 सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर, मिळवलं एवढ्या लाखांचं रोख बक्षीस
First published: