महाराष्ट्र सरकारचा दारूण पराभव! म्हणत भाजप नेते राम कदमांनी केली मोठी गर्जना!

महाराष्ट्र सरकारचा दारूण पराभव! म्हणत भाजप नेते राम कदमांनी केली मोठी गर्जना!

राम कदम ढोल, ताशे वाजवत गुलाल उधळत, वाजत गाजत, नाचत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला जाणार

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर: दिवाळीच्या पाडव्यापासून मंदिरांसर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारनं (Maharashtra Government) परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं सर्वस्तरातून स्वागत होत आहे. विरोधी पक्षांनं देखील सरकारनं योग्य निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पण, सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण, असं सांगत जोरदार हल्लाबोल भाजपनं (BJP) केला आहे.

भाजप नेते राम कदम (MLA Ram Kadam) उद्या (सोमवारी) सिद्धिविनायकाचं (Dadar Siddhivinayak Temple) सकाळी 11 वाजता दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे राम कदम ढोल, ताशे वाजवत गुलाल उधळत, वाजत गाजत, नाचत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला जाणार आहेत.

हेही वाचा...काश्मीरमध्ये हंगामातली पहिली बर्फवृष्टी; मुंबईकर लुटतायत आनंद ! Exclusive Video

आमदार राम कदम यांनी ट्वीट करून मंदिर उघडण्याच्या निर्णयावर राज्य सरकावर घणाघाती टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार, असा असं राम कदम यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे.

भाजपनं घेतला होता आक्रमक पवित्रा...

दरम्यान, लॉकडाऊननंतर राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपनं आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. यासाठी संपूर्ण राज्यात उद्धवा द्वार उघड... असं म्हणत घंटानाद आंदोलनही छेडलं होतं.

काय आहे मुख्यमंत्र्यांचं आवाहन?

मुख्यमंत्री म्हणाले, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झालं आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली. या पुढेही जनतेनं शिस्त पाळायची आहे. नागरिकांनी मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...आमदार रवी राणांची अखेर सुटका, तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना डिवचलं

कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा', असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 15, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या