मनावर दगड ठेवून दिवाळीचा शिरस्ता मोडावा लागतोय; सुप्रिया सुळेंचं भावनिक आवाहन

मनावर दगड ठेवून दिवाळीचा शिरस्ता मोडावा लागतोय; सुप्रिया सुळेंचं भावनिक आवाहन

यंदा सुरक्षेच्या कारणास्ताव दिवाळीत कोणीही बारामतीला येऊ नये असं भावनिक आवाहन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटरवरुन केलं आहे.

  • Share this:

बारामती, 15 नोव्हेंबर: पवार कुटुंबाची दिवाळी दरवर्षी दणक्यात साजरी होते. राज्यातीलच काय देशभरातील कार्यकर्ते, नेतेमंडळी पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये येतात. पण यंदा कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 'दरवर्षीप्रमाणे यंदा बारामतीमध्ये येऊ नका असं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. मनावर दगड ठेऊन हा निर्णय घ्यावा लागत आहे' असं त्यांनी नमूद केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. या पत्रामध्ये लिहीलं आहे,‘बारामती येथे पवार कुटुबियांच्या उपस्थितीत परंपरेनुसार साजरा होणारा दिवाळीचा सण तसंच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या भेटीगाठी शुभेच्छांचा पारंपरिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. हितचिंतकांनी यंदा बारामतीला न येता घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षीची दिवाळी मात्र आपल्या परंपरेनुसार उत्साहात जल्लोषात बारामतीला पुन्हा एकत्र येऊन साजरी करुयात.’

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा बारामतीमध्ये न येता कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. पवार कुटुंबियांची दिवाळी गेल्या अनेक दशकांपासून अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. भाऊबीजेलादेखील पवारांचं सगळं कुटुंब एकत्र जमतं आणि उत्साहात भाऊबीज साजरी केली जाते. पण यंदा हितचिंतकांना आणि कार्यकर्त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव बारामतीमध्ये न येण्याचं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 15, 2020, 5:13 PM IST

ताज्या बातम्या