सातारा, 5 मार्च : साताऱ्याच्या कोरेगावमध्ये झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवारांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. खोकेवाले भोसले म्हणून डी.पी.भोसले कोरेगावमध्ये परिचित होते, आताचे खोकेवाले नाही, तेव्हाचे खोकेवाले वेगळे होते. तेव्हाचे भोसले तुम्हाला हवं ते घ्या, असं म्हणायचे, मात्र आजच्या खोक्यांवर मी आता जास्त काही बोलत नाही, असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेना आमदारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
'देशाचं चित्र बदलत आहे'
त्याआधी शनिवारी शरद पवार यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे. हा बदल आहे, तो पुण्यात होत आहे याचा अर्थ लोक वेगळ्या विचाराच्या प्रक्रियेत आहेत', अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
मला वाटत आहे की, बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. सध्या झालेल्या पदवीधर निवडणुका आणि इतर निवडणुकांमध्ये जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एक सुद्धा जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं सत्तेच्या वापर त्यांचा हे या निवडणुकीत दिसून आले आहे. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, असं शरद पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Sharad Pawar, Shivsena