'भारत-पाकमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न', पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेची 'ही' प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मेळाव्यात बोलताना पाकिस्तानचं जसं चित्र आपल्यासमोर रंगवलं जातंय तशी परिस्थिती नाही असं वक्तव्य केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 01:55 PM IST

'भारत-पाकमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न', पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेची 'ही' प्रतिक्रिया

मुंबई, 15 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानबद्दल जे चित्र देशात रंगवलं जात आहे तेवढी वाइट परिस्थिती नाही असं म्हटलं होतं. काही लोकांकडून स्वत:च्या फायद्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे असं शरद पवार म्हणाले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी पवारांचे वक्तव्य निंदनीय असल्याचं म्हटंल आहे.

शरद पवार यांना नेते आणि कार्यकर्ते सोडून चालले आहेत. त्यांना नैराश्य आलं आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचं कौतुक करणं कितपत योग्य आहे? पवारांच्या मनात पाकिस्तानमधून कार्यकर्ते आयात करण्याचा डाव तर नाही ना? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले होते की, देशात वेगळं वातावरण पसरवलं जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे पाकिस्तान असं दाखवलं जात आहे. पण इतकी वाईट परिस्थिती तिथं नाही.

Loading...

बीसीसीआयचा अध्यक्ष असताना तिथं गेलो होतो. तेव्हा वेगळं वातावरण मी पाहिलं आहे असं पवार म्हणाले होते. देशात जन्मलेल्या व्यक्तीला मी हिंदुस्तानी आहे असं बोलायला का सांगितलं जातं. यापूर्वी कधीच मॉब लिंचिंग शब्द ऐकला नव्हता असं सांगत शरद पवारांनी झुंडबळीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

राज्याने दुष्काळाची दाहकता आणि महापुराचं रौद्ररूप एकाच वेळी अनुभवलं. त्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले होते की, राज्यात ओला दुष्काळ आणि पूरस्थिती ओढवली पण देशाच्या प्रमुखांनी पाहणीसुद्धा केली नाही असा आरोप पवारांनी केला होता.

भारत-अमेरिकेच्या सैनिकांनी एकत्र गायलं आसाम रेजिमेंटचं मार्चिंग गाणं, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...