पंढरपूर, 29 सप्टेंबर : रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. पण, आज शरद पवार यांनी 'तुमच्या एकतरी आमदार आहे का?' असा सवाल करत सणसणीत टोला लगावला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि हभप रामदास महाराज कैकाडी (जाधव) या तीन दिग्गज व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने पवार यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी एनडीएत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांनी खुमसाद उत्तर दिले.
एक आमदार तरी आहे का? शरद पवारांचा रामदास आठवलेंनी सणसणीत टोला pic.twitter.com/McKWn1H9oa
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2020
'रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहे. पण त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यसभेत ही आणि बाहेर सुद्धा त्यांनी कुणी ही गांभीर्याने घेत नाही. त्यांचा पक्षाचा एक सुद्धा आमदार नाही आणि खासदार सुद्धा नाही. ते नुसते बोलत असता, मार्गदर्शन करत असता', असं म्हणत शरद पवारांनी आठवले यांना चांगलाच टोला लगावला आहे.
'राऊत-फडणवीस भेटीचा राजकीय अर्थ नाही'
'संजय राऊत यांनी फडणवीस यांची घेतलेल्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढायचे कारण नाही. राऊत यांनी माझी ही मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असं जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेही कारण नाही', असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.
'राज्यात मध्यावधीची शक्यता नाही'
त्याचबरोबर भजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही दोन्ही नेत्यांची भेट ही राजकीय असल्याचे वक्तव्य केले होते तसंच राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. ' असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करत शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकाचे खंडन केले आहे.
मध्यावधी निवडणूक? संजय राऊतांकडून चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचं खंडन
'शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. सरकाराला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे टिकेल', असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
'सुशांत प्रकरणावर लक्ष हटवले जात आहे'
'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे', असंही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NDA, RPI, Sharad pawar, रामदास आठवले, शरद पवार