जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काँग्रेस नेत्यांच्या भेटीत शरद पवारांकडून थेट सवाल, बैठकीत नाना पटोले गैरहजर

काँग्रेस नेत्यांच्या भेटीत शरद पवारांकडून थेट सवाल, बैठकीत नाना पटोले गैरहजर

काँग्रेस नेत्यांच्या भेटीत शरद पवारांकडून थेट सवाल, बैठकीत नाना पटोले गैरहजर

Sharad Pawar Meeting: मंगळवारी काँग्रेसचे एच.के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै: मंगळवारी काँग्रेसचे एच.के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात **(Balasaheb Thorat)**आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये (MVA Government) एकच गोंधळ उडाला होता. या वादानंतर ही भेट झाली. या भेटीत शरद पवार यांनी आपली नाराजी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केल्याचं समजतंय. तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार का? तुमचा निर्णय झाला असेल तर ते स्पष्ट सांगा, असं शरद पवार काँग्रेच्या नेत्यांना म्हणाले आहेत. पक्ष वाढवण्याच्या भाषेविषयी आपल्या मनात कुठलीही शंका नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढवला देखील पाहिजे. मात्र ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही. अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा स्पष्ट शब्दात पवार काँग्रेस नेत्यांशी बोलले असल्याचं वृत्त आहे. पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा तुमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. मुंबई काँग्रसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण यासंदर्भातले अधिकार दिलेत? दिले असतील तर तसंही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नसल्याचं पवार म्हणालेत. हेही वाचा-  ऑनलाईनच्या नावाने चांगभलं, प्रवेश देतो सांगून शिक्षकाने घातला विद्यार्थ्यांना लाखोंना गंडा! काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत असताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्यावर पाळत ठेवतात, असं विधान केलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर अजित पवार यांनी सुद्धा नाना पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. तसंच, काँग्रेसच्या नेत्यांसोबत याबद्दल बोलणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन भेट घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात