मुंबई, 13 जुलै : कोरोनामुळे (corona) शालेय शिक्षण व्यवस्था पार कोलमाडून गेली आहे. सर्वत्र ऑनलाईन (online education) शिक्षण दिले जात आहे. याच संधीचा फायदा घेऊन एका शिक्षकाने (teacher) अनेकांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील बोरिवलीमध्ये समोर आली आहे.आपली ओळख मॅनेजमेंट स्टडीजमध्ये असून आपण चांगल्या क्लासेस आणि कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देऊ शकतो, असं सांगून या शिक्षकाने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील पारसनाथ मिश्रा (sushil mishra) असं या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाला अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या विभागात ऍडमिशन मिळवण्याकरता लाखो रुपये दिले होते. सुशीलने या सगळ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्या मुलांना ऍडमिशन देखील दिले. एवढंच नाहीतर त्यांच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस देखील सुशीलने सुरू केले. त्यानंतर पोलीस तपासात मात्र हे सर्व बनावट असल्याचं समोर आलंय. शास्त्रज्ञांचा सल्ला लस घेतल्यानंतर तीन दिवस करू नका सेक्स, हे आहे कारण मिश्राने सांगितल्यानुसार, विद्यार्थी पालक ऍडमिशन घ्यायचे त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू देखील व्हायचे. पण काही दिवसातच ते ऑनलाईन क्लासेस बंद व्हायचे.आता मुद्दा हा होता की ऑनलाईन क्लासेस बंद होण्यामागची नेमकी कारणे काय आहेत. हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना लक्षात येत नव्हतं. मात्र या प्रकरणी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अधिक चौकशी केली तेव्हा त्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले. ज्या शिक्षकाकडे मार्गदर्शक म्हणून या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मार्गदर्शन घेतले होते, त्याच शिक्षकाने या सर्वांची फसवणूक केल्याचे समोर आले पोलिसात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी चौकशी केली त्यात तर आणखी धक्कादायक खुलासे समोर आले. गाळे दिले नाही म्हणून तलवारी नाचवल्या, तिघांवर केले वार; गावातला थरारक VIDEO सुशीलने केलेले मुलांचे ऍडमिशन हेदेखील बनावट होते. त्याच बरोबरमुलांचे जे ऑनलाईन क्लासेस सुरू केले होते. ते देखील बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे, पोलिसांनी सुशीलला अटक केली असून त्याने अशाप्रकारे अनेकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे, सुशीलने नेमकी कोणा-कोणाची फसवणूक केली आहे. याबाबत उत्तर विभाग सायबर पोलीस विशेष तपास करत आहे. सायबर पोलिसांनी वेळीच सुशीलच्या मुसक्या आवळल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.