जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील लॉजमधील 'धक्कादायक' प्रकार पाहून पोलिसही चक्रावले, नंतर घडलं असं...

पुण्यातील लॉजमधील 'धक्कादायक' प्रकार पाहून पोलिसही चक्रावले, नंतर घडलं असं...

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या प्रमुखाने पोलिसांना स्पष्टीकरण दिलं की, महिलेचा पती आजारी आहे. त्यामुळे काही पैशांसाठी महिला तिची खोली भाड्याने देत होती.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या प्रमुखाने पोलिसांना स्पष्टीकरण दिलं की, महिलेचा पती आजारी आहे. त्यामुळे काही पैशांसाठी महिला तिची खोली भाड्याने देत होती.

वेश्यागमनासाठी महिला पुरवून बनावट ग्राहकाकडून आरोपीनं एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारताच…

  • -MIN READ
  • Last Updated :

जुन्नर, 26 ऑक्टोबर: पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील नारायणगाव-ओझर रोड वर धनगरवाडी येथील कारखाना फाट्यावर हॉटेल सहयाद्रीवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नारायणगाव पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतलं आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे लॉजमधील आक्षेपार्ह प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहेत. नारायणगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री लॉज, कारखाना फाटा, (धनगरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे), येथे प्रवीण राम जाधव (वय-32 वर्षे, राहणार नारायणगाव, तालुका- जुन्नर, जिल्हा-पुणे) हा सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवून स्वतःची उपजिविका करत आहे, अशी माहिती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना मिळाली होती. सदर माहितीची दखल घेत दत्तात्रय गुंड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांना कळवली. हेही वाचा.. ऑनलाईन दसरा मेळावा पडला महागात! पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मंदार जवळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर छापा कारवाईसाठी पोलीस स्टाफ, पंच व बनावट गिराईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून छापा कारवाई साठी रवाना केले. या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली. त्याप्रमाणे सह्याद्री लॉजचे व्यवस्थापक प्रवीण राम जाधव यांनी वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्यांचेकडून एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली. दरम्यान लगेच पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारी पीडित महिलेला ताब्यात घेऊन लॉजचे व्यवस्थापक प्रवीण राम जाधव यांना ताब्यात घेतले आहे. आणि जुन्नर न्यायालयात हजर केले असता असता त्यांची एक दिवसाची पोलिस कस्टडी मंजूर केली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत. दरम्यान नारायणगाव परिसरात व पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या बहुतेक हॉटेल व लॉज वर अवैध रित्या वेश्या व्यवसाय सुरू असुन याठिकाणी सुद्धा कारवाई करावी अशी मागणी होत आहे. हेही वाचा… बँक अकाऊंट हॅक करून लुटले होते सव्वा 2 कोटी, अखेर नायजेरियन हॅकरसह 5 जण अटकेत या कारवाई साठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के, व नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात